Home ताज्या बातम्या कार्य समाजासाठी प्रेरणादायी – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

कार्य समाजासाठी प्रेरणादायी – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

0

नांदेड,दि.1 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे   सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोप आणि अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबिनार द्वारे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मातंग समाज मंडळ, शिव सहकार सेना पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले,  अण्णाभाऊ साठे यांनी दलित, शोषित आणि कष्टकरी त्यांच्या हितासाठी  फार मोठे कार्य केले आहे. अण्णांचे  शिक्षण कमी असूनसुद्धा त्यांची साहित्य संपदा फार मोठी आहे, त्यांनी विविध कथा, कादंबऱ्या, पटकथा लिहल्या असून, अनेक पोवाडे, लोकनाट्याची निर्मिती केली आहे,  ही त्यांना ईश्वराने दिलेली एक देणच म्हणावी लागेल,  असे त्यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा आणि लोककलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करून इंग्रजांच्या विरोधात, भारतीयांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा गोवा मुक्ती संग्राम  असो यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते   अण्णाभाऊ साठे यांनी फकीर नावाची कादंबरी लिहली आहे, या कादंबरीचा मूळ हेतू  अन्यायाविरुद्ध लढा  व सर्वसामान्यiच्या हिताचे कार्य हा होता. अण्णा भाऊ साठे यांचे,  जीवन कार्य फार अदभूत आणि  महान होते.त्यांनी समाजाच्या हितासाठी खूप मोठं कार्य केले आहे.  त्याकाळी, मुंबईतील गिरणी  कामगारांच्या व्यथा,  पोटासाठी भटकंती,  करणाऱ्या मजुरांचे दुःख त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या साहित्यातून समाजापुढे मांडलं अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने समाजसेवक होते. त्यांचे कार्य फक्त्त साहित्य पुरतं मर्यादित नसून देशातील परकीय राजवट संपली पाहिजे यासाठीही त्यांनी कार्य केले, असे ते म्हणाले. कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री रमेश बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिव सहकार सेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे,  रवींद्र बागवे, अविनाश बागडे,  हनुमंत साठे, रवींद्र दळवी, विजय अंभोरे आदींनी आपला ऑनलाइन सहभाग नोंदविला. लहुजी समता परिषदेचे, अध्यक्ष अनिल हातागले  यांनी आभार व्यक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 11 =

error: Content is protected !!
Exit mobile version