Home ताज्या बातम्या महाराष्ट्र विकास समितीचा देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाला इशारा,पावसामुळे काॅम्पलेक्स मध्ये साचलेल्या पाण्याचा लवकर...

महाराष्ट्र विकास समितीचा देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाला इशारा,पावसामुळे काॅम्पलेक्स मध्ये साचलेल्या पाण्याचा लवकर बंदोबस्त करावा

0

देहुरोड,दि.25 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आज देहूरोड शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले, जणू देहूरोड शहर पाण्याचे तळ बनला आहे हायवे रोडवर पाणी तसेच काही सोसायट्यांमध्ये पाणी व तसेच देहूरोड मध्ये कॉम्प्लेक्स त्याचे नियंत्रण देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्डाकडे आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये ही पाणी साठलं होतं त्यामुळे महाराष्ट्र विकास समितीने त्यावर कडक आवाज उठवत आज कॅन्टोन्मेंट बोर्डाला साचलेले पाणी काढण्यासाठी इशारा दिला आहे त्यावर सॉलोमन भंडारे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते काय म्हणतात ते आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता

महाराष्ट्र विकास समितीचा कॅन्टोमेंट बोर्डाला इशारा,पावसामुळे साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा

मुसळधार पावसाने,देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या शॉपिंग मॉलला तळ्याचे स्वरूप,अनेक दुकानात शिरले पाणी.आधीच टाळेबंदी मुळे त्रस्त दुकानदार झालेत आणि त्यात या पावसाच्या पाण्याने दुकानातील चीज वस्तू खराब झाल्यात,खरं तर बोर्ड प्रशासन भरमसाठ भाडे आकारत आहे तर सुविधांचा अभावी महाराष्ट्र विकास समितीचे सोलोमन भंडारे ( सर ),राजू मारीमुत्तु,पंकज तंतरपाळे यांनी कॅन्टोमेंट बोर्डाला इशारा दिलाय, लवकरात लवकर या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, कोरोनाचा कहर सुरू असताना,डेंगू, मलेरिया ,गेस्ट्रो ने ही डोके वर काढलंय तरी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथील व्यापारी वर्गाकडून होत आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − two =

error: Content is protected !!
Exit mobile version