Home ताज्या बातम्या कुंभार समाजीची कुटुंबे उध्वस्त करणारा शासन निर्णय गणेश मुर्ती उंचीच्या निर्णयाचा शासनाने...

कुंभार समाजीची कुटुंबे उध्वस्त करणारा शासन निर्णय गणेश मुर्ती उंचीच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा

0

पिंपरी,दि.25 जुलै 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्य शासनाने गणेश मुर्तीच्या उंचीसंदर्भात घेतलेला मार्गदर्शक सुचना निर्णय राज्यातील कुंभार समाजाला उध्वस्त करणार ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसदस्य सतिश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केले आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मुर्तींची उंची चार फुट तर घरगुती गणेशोत्सवाच्या गणेश मुर्तींची उंची दोन फुट ठेवावी असे आदेश काढले आहेत. या संदर्भातील आदेश गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी पारित केला आहे.
सतिश दरेकर या संदर्भात म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी 11 जुलै 2020 रोजी आदेश क्र. – आरएलपी- 0620/प्र.क्रं.90/विशा 1  परित केला आहे. त्यातील क्र तीन च्या मुद्यामध्ये गणेश मुर्तीच्या उंचीबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या या आदेशाला उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने कुंभार समाज उत्सवाच्या आधी आठ ते दहा महिने मुर्ती तयार करण्याचे काम करत असतात. यासाठी मुर्तीकार मोठ्या प्रमाणात कर्जे घेत असतात. सद्य स्थितीत कोरोनामुळे कुंभार समाज आधिच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या गणेश मुर्तींच्या या आदेशामुळे तयार केलेल्या मुर्ती विकल्या जाणार नाहीत व राज्यातील कुंभार समाज मोठ्या अर्थिक संकटात सापडून पूर्णतः उध्वस्त होईल यामुळे या मार्गदर्शक सुचना निर्णयातील क्र. तीनच्या मुद्याचा शासनाने फेरविचार करावा व क्र. 3 ची अंमलबजावणी या वर्षी करु नये. अशी विनंती शासनाला केली आहे.
या संदर्भात सतिश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी विनंती केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + ten =

error: Content is protected !!
Exit mobile version