तळेगाव,दि.24 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता येत्या ०१ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे. मागास व वंचित समाजाच्या व्यथा वेदना त्यांनी आपल्या साहित्यातुन परिणामकारकरित्या मांडल्या. त्याचसोबत त्याचे समाजकार्यही उल्लेखनीय आहे. त्यामुळे समाजकारण व साहित्य क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडुन भारतरत्न पुस्काराची शिफारस करण्यात यावी यासाठी सबंध महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्याकरिता विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहा मध्ये याबाबतचा ठराव होणे अत्यंत महत्वाच आहे.
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ किताब मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशा मागणीचे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मावळ विधानसभेचे कार्यक्षम आमदार सुनिलअण्णा शेळके यांनी पाठविले.समस्त मातंग समाजातुन तर मागणी होतच आहे पण आता सर्व समाजातुन ही मागणी होत आहे.
‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न द्यावे,’ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे, यासाठी २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केंद्राकडे शिफारस केली होती. त्यानंतर २०१० मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या संदर्भात शिफारस पत्र पाठविले होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मागासवर्गीय, कष्टकरी वर्ग, महिलांच्या दुःखांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. मराठी साहित्याची उंची वाढविली आहे. त्याबद्दल त्यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी आमदार सनिल अण्णा शेळके यांनी ही पञकाद्वारे केली