देहुरोड,दि.24 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-श्री क्षेत्र देहू गाव या ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून पीडित महिलेच्या दिराने केली शरीरसुखाची मागणी व पीडित महिलेचे जाऊ व दिर या दोघांनी मिळून पीडित महिलेला केली मारहाण पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन अरोपी 1)कैलास नथुराम चव्हाण (दीर)व आरोपी 2)अश्विनी कैलास चव्हाण (जाऊ) यांच्या विरोधात देहुरोड पोलिस स्टेशन मध्ये दि.23 जुलै 2020 रोजी 11.17वाजता (विनयभंग) गुन्हा.रजि.नं.354/2020भा.द.वि.क 354अ,323,324,504 या प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
अरोपी कैलास चव्हाण हा पिडित महिलेला 4 एप्रिल 2020 रोजी म्हणला “तु माझ्या वेडया भावासोबत का राहते माझ्या सोबत अधुन मधुन लॉजला येत जा मी काय आणि माझा भाऊ काय तुला काय फरक पडतो माझ्या सोबत झोपत जा मी तुला पाहिजे ते देतो” असे म्हणुन पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल
असे कृत्य करुन दिनांक 05 एप्रिल 2020 रोजी आरोपी कैलास चव्हाण व त्याची पत्नी अश्विनी कैलास चव्हाण यांनी पिडीत महिलेच्या घरी जाऊन पिडीत महिलेस शिवीगाळी व मारहाण करुन तिची बरगडी फॅक्चर करुन जखमी केले,पिडीत महिला जखमी असल्याने त्यांनी औषध उपचार घेवुन 23 जुलै 2020 रोजी पोलीस ठाणे येथे येवुन स्वता तक्रार दिली.सदर घटनेचा तपास हा देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बोरकर मॅडम याकडे असुन त्या पुढील तपास करत आहेत