Home ताज्या बातम्या जातीय व्देषातुन एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका बौद्ध तरुणाची केली निर्घुन...

जातीय व्देषातुन एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका बौद्ध तरुणाची केली निर्घुन हत्या

0

पिंपळे सौदागर, 09 जून 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-खालच्या जातीतला मुलगा सवर्ण जाती तील आपल्या मुलीवर प्रेम करतो या रागातून एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाणे हाद्दीत घडली. विराज जगताप असं या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एकूण सहा आरोपी असून सहा अरोपीना अटक झाली असुन अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर मध्येही ही घटना घडली असुन. मयत तरुण विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुख्य आरोपी हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे,रोहीत जगदीश काटे,कैलास मुरलीधर काटे,जगदीश मुरलीधर काटे,हर्षद कैलास काटे,या आरोपींनी विराजवर हल्ला केला.7 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विराज जगताप हा आपल्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. टेप्पोच्या धडकेमुळे विराज खाली पडला. त्यानंतर आरोपी हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली.

‘तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची, तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो’, असं म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकले आणि लोखंडी रॉड विराजच्या डोक्यात घातला आहे. सहा आरोपींनी दगड आणि लोखंडी रॉडने विराजला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी बेशुद्ध अवस्थेत विराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृत विराज जगतापच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम 302/143,147,148, 149 सह अनु.जाती जमाती कायदा कलम 3 (1) (आर), (एस) 3 (2) ()3 (2) (व्ही) 6 मपो.अधि. 1951 चे कलम 37 (1) 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर 8 जून रोजी मुख्य आरोपी आरोपी हेमंत काटे, सागर काटे याला अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मृत विराज जगताप यांच्या कुटुबांची मागणी आहे हे प्रकरण फास्टट्रॅक मध्ये चालावे आरोपीना फाशीची शिक्षा द्या आणि आमच्या मुलाला न्याय द्या,
आज दि.9 रोजी मृत विराज जगताप यावर अत्यसंस्कार झाले.
संपुर्ण महाराष्र्टातुन सोशल मीडिया मधुन बौद्ध तरुण आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते ह्या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवत आहेत.विराजला न्याय मिळावा अरोपीना लवकारात लवकर शिक्षा व्हावी ही मागणी जोर धरत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five − 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version