Home औरंगाबाद धक्कादायक प्रकार! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा रेल्वे मालगाडीखाली चिरडून मृत्यू तर ३ जण...

धक्कादायक प्रकार! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा रेल्वे मालगाडीखाली चिरडून मृत्यू तर ३ जण जखमी.

0

 औरंगाबाद,दि.८मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा झाला अपघाती मृत्यू अतिशय धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटे एक मोठी भीषण दुर्घटना झाली, बदनापूर ते करमाड दरम्यान मालगाडी खाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर ५जण जखमी झाले होते त्यातील दोघांचा घाटी रुग्णालयात झालाउपचारा दरम्यान मृत्यु,तीन जणा वर रुग्णालयात उपचार चालु आहेत. जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायीपीठ करत औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले, सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर काही मजूर गंभीर जखमी झाले.जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेण्यात आले आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत. लॉकडाउनमुळे सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. पण रेल्वेची मालवाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखादी गाडी मिळेल त्या गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीतील ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले होते. पण प्रवासादरम्यान रात्र झाली म्हणून सर्वांनी रेल्वे रुळावरच झोपण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला.त्या मुळे सगळी कडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + twelve =

error: Content is protected !!
Exit mobile version