तळेगाव,दि.१मे२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.या वर्षी कोरोणाचा वाढता प्रादुर्भावा मुळे घरी राहुनच हा महाराष्र्ट दिन साजरा करत अहोत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचे बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना प्रथम विनम्र श्रद्धांजली !!हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लढलेल्या, योगदान दिलेल्या, राज्याच्या सुपुत्रांच्या त्यागाबद्दल आपण कृतज्ञता सदैव बाळगली पाहिजे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलीस, सैनिक, डॉक्टर, संशोधक,पञकार, खेळाडु, कलावंत, साहित्यिक अशा व्यक्तींच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून, दूरदृष्टीतून हा आपला महाराष्ट्र घडला आहे.औद्योगिक, शैक्षणिक, कृषी इ. क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असला तरी येत्या काळात अनेक संकटांवर मात करून राज्याला अत्युच्च पातळीवर नेण्याचा संकल्प यानिमित्ताने करूया.
कोरोना सारख्या संकटांला खंबीरपणे सामोरे जाऊन आपण त्यावर मात करणारच याचा मला विश्वास आहे, आपण ही लढाई संयुक्तपणे, सर्व ताकतीने लढण्याचा निश्चय या महाराष्ट्रदिनी करूयात.सर्वाना महाराष्र्ट दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.