हिंगोली,मंबई,दि.१ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-हिंगोली जिल्ह्यात आज शुक्रवारी म्हणजेच 1 मे रोजी कोरोना बाधित 25 रुग्ण वाढले असून रुग्णांची संख्या 47 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णात सर्व जण एसआरपीएफचे जवान आहेत.हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्तावरून 19 व 20 एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी पंधरा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जालना येथील एक जवान गावाकडे परत आल्यावर त्याच्या तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील दोन जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर वसमत व सेनगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्याची रुग्ण संख्या कालपर्यंत 21 होती.
मात्र आज शुक्रवारी 1 मे रोजी रुग्ण संख्येत पंचवीसने वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 25 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची संख्या 47 इतकी झाली असून एका रुग्ण ने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मालेगावहून आलेल्या 33 तर मुंबईहुन आलेल्या 8 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील खाजगी ट्रॅव्हल्सवरील चालक 23 एप्रिल रोजी पंजाब राज्यात भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. 28 एप्रिल रोजी तो परत आला होता. या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीच्या एका रुग्नावर संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.