Home ताज्या बातम्या सरपंच महिलेने चक्क चप्पलने ग्रामसेवकास केली मारहाण,लॉकडाउनचे नियम पाळा असे सांगितल्याने

सरपंच महिलेने चक्क चप्पलने ग्रामसेवकास केली मारहाण,लॉकडाउनचे नियम पाळा असे सांगितल्याने

0

नांदेड,दि.२९ एप्रिल२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-लॉकडाउनचे नियम पाळा असे सांगणाऱ्या ग्रामसेवकाला महिला सरपंचाने चप्पलने मारत श्रीमुखातही लगावली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनीही त्यास शिविगाळ करत मारहाण केली. हा प्रकार घोटी (ता. किनवट) येथे ता. २६ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ता. तीन मेपर्यंत लॉकडाउन सुरू आहे. या काळात नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा कडक सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र काही महाभाग लॉकडाउनचे उल्लंघन करत सर्रास तोंडाला मास्क न लावता व शारिरीक अंतर न ठेवता घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी संबंधीत स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर शासन नियुक्त कर्मचाऱ्यांकडून प्रबोधन जनजागडती करण्याचे काम सुरू आहे.मात्र कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनाच नागरिकांकडून कटु अनुभव येत आहेत.
घोटी (ता. किनवट) येथील नागरिक घराबाहेर पडून एकत्र बसल्याची माहिती घोटी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रेमानंद शिरशेवाड यांना मिळाली. यावेळी त्यांनी तिथे जाऊन पाहिले, तर एकाही नागरिकाने तोंडाला मास्क लावले नव्हते. तसेच ते एकमेकांपासून दुर बसले नव्हते. यावेळी ग्रामसेवकांनी तोंडाला मास्क लावा व घरी जा, अशा सुचना दिल्या.यावेळी सरपंचाच्या पतीने ‘तू लोकांचे ऐकून आम्हाला शहाणपणा शिकवितो काय,’ असे म्हणून त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. त्यांना ओढत नेऊन मारहाण केली. त्यानंतर सरपंच महिलाही पुढे आली. त्यांनी हा वाद मिटवायला पाहिजे होता. मात्र त्यांनीही यात उडी घेतली. पतीचा अपमान सहन न झालेल्या सरपंच महिलेने चक्क चप्पलने ग्रामसेवकास मारहाण केली. तसेच त्यांच्या श्रीमुखात भडकावली. शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
घडलेल्या प्रकारानंतर भयभीत झालेल्या ग्रामसेवकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. किनवट पोलिसांनाही माहिती दिली. यावेळी प्रमेनंद शिरशेवाड यांच्या फिर्यादीवरुन महिला सरपंचसह अनेकांवर शासकिय कामात अडथळा, संगनमत करून मारहाण आणि राष्ट्रीय आपत्तीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + five =

error: Content is protected !!
Exit mobile version