Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहरातील १६ ठिकाणांच्या परिसरात कंटेनमेंट झोन

पिंपरी चिंचवड शहरातील १६ ठिकाणांच्या परिसरात कंटेनमेंट झोन

0

पिंपरी,दि. २७ एप्रिल २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पिंपरी चिंचवड शहरातील कोविड – १९ च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने संपुर्ण महापालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषीत करण्याची आवश्यकता राहीली नसल्याने पिंपरी चिंचवड शहरातील १६ ठिकाणांचे परिसरात कंटेनमेंट झोन सोमवार दि . २७ एप्रिल २०२० रोजी रात्री १२.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत घोषित करणेत येत असून सदर परिसराच्या सर्व सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधित पोलिस प्रमुख या भागाच्या हद्यी सील करतील तसेच, सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत असल्याचे आदेश आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

साथरोग नियंत्रण अधिनियम , १८९७ (एपिडमीक अक्ट) मधील तरतूदी नुसार, खालिल नमुद क्षेत्रातील परिसरास कंटेंनमेन्ट झोन घोषीत करणे आले असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अ. क्र कंटेंनमेन्ट झोन समाविष्ट क्षेत्र
१ खराळवाडी परिसर, पिंपरी जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परिसर, पिंपरी (गिरमे हॉस्पिटल – अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, ओरियंटल बॅंक, सिटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल)
२ पि एम टी चौक परिसर, भोसरी पाटील हॉस्पिटल पिएमटी चौक, मारुती मंदिर, पिसिएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस.
३ गुरुदत्त कॉलनी परिसर, भोसरी भोसरी आळंदी रोड, बिकानेर स्विट्स, एच पि पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, भारत पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागिल बाजु, न्यु मिलान बेकरी, हरी ओम स्विट्स, महा-ई सेवा केंद्र, ममता स्विट्स, आनंद हॉस्पिटल
४ रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी सि एम ई हद्द, 7 Apple हॉटेल, सिधार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस
५ गणेश नगर परिसर, दापोडी पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दि टॉवर्स, माता शितळादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यु मिलेनियम इंग्लिश स्कुल
६ शास्त्री चौक परिसर, भोसरी संत ज्ञानेश्वर प्रार्थमिक शाळा, परफेक्ट इलेक्ट्रिल, व्यंकटेश मेडीकल, महानगर को-ऑप. बॅंक, भोसरी आळंदी रोड
७ संभाजीनगर परिसर, आकुर्डी हॉटेल शिवशंकर, तुळजाभवानी मंदिर, बॅंगलोर बेकरी, कस्तुरी मार्केट
८ रोडे हॉस्पिटल परिसर, दिघी महा-ई सेवा केंद्र दिघी, गुरुकृपा मॉल, अष्टविनायक दुध डेअरी, जान्हवी ट्रेडर्स
९ तनिष्क ऑर्किड परिसर, चऱ्होली तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द
१० कृष्णराज कॉलनी परिसर, पिंपळे गुरव पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा
११ नेहरुनगर बस डेपो परिसर, भोसरी जनता सहकारी बॅंक, नुरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हायद्राबाद बिर्याणी हाऊस.
१२ कावेरीनगर पोलिस लाईन परिसर, वाकड बि एस एन एल टेलिफोन एक्सचेंज, Seseme शाळा रस्ता, Infant Jesus High School, अण्णाभाऊ साठे नगर
१३ रुपीनगर परिसर, तळवडे दिपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती शक्ती बस डेपो
१४ फातीमा मशिद गंधर्वनगरी परिसर मोशी जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सुर्योदय, PAMU हायड्रोलिक्स, मोशी कचरा डोपो, पुणे नाशिक हायवे
१५ विजयनगर परिसर, दिघी शिवशंकर आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्ही आर एल कुरिअर सर्व्हिसेस
१६ आदिनाथ नगर परिसर, भोसरी पुणे नाशिक हायवे, एच पी गॅस, आदिनाथ नगर मेन रोड, निलकंठेश्वर मंदिर, रुपी को-ऑप बॅंक, आई मॅटर्निटी होम, राज मेडिकल, सरस्वती को-ऑप बॅंक ATM
या कंटेनमेंट झोन मध्ये
१. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
२. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बॅकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत सुरु ठेवाव्यात तसेच आपली ए.टी.एम.केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
३. कंटेनमेंट क्षेत्रात सदर काळात सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.
तसेच उर्वरीत क्षेत्रात दुधाची किरकोळ विक्री सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० या कालवधीतच सुरु राहील.
शहराच्या उर्वरीत भागात भाजीपाला व फळे विक्री ही सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत मनपा मार्फत निश्चित केलेल्या जागांवरच सुरु ‍ राहिल. त्याव्यतीरिक्त उर्वरित कालावधी मध्ये विक्रीस प्रतिबंध राहील. घरपोच भाजीपाला व फळे विक्री ही मनपाच्या पूर्व मान्यतेनुसारच अनुज्ञेय करण्यात येईल.
४. कंटेनमेंट क्षेत्रात सदर काळात मटण व चिकन यांची किरकोळ विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेश नुसार सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या कालवधीतच सुरु राहिल.
शहराच्या उर्वरीत भागात सदर विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेश नुसार सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत सुरु राहील.
५. कंटेनमेंट क्षेत्रात सदर काळात अत्यावश्यक इतर सामान जसे अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री सुद्धा सकाळी १०:०० ते दुपारी १२ :०० या कालवधीतच सुरु राहिल.
शहराच्या उर्वरीत भागात सदर विक्री सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत सुरु राहील.
६. जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी ८:०० ते रात्री १०.०० या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घेवून अनुज्ञेय राहिल. सदर सुविधेकरीता फक्त मनपाच्या अधिका-याव्दारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.
७. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधी दुकाने संपुर्ण कालावधी करीता खुली राहतील.
८. अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. ०३ मे पर्यंतच लागू रहातील यानंतर मनपा मार्फत नव्याने पास घेणे संबंधीत आस्थापनांना बंधनकारक राहिल.
९. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पास मनपा मार्फत उपलब्ध करून दिले जातील. याकरिता संबंधीत आस्थापनेचे विभाग प्रमुख शासनाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक कर्मचा-यांची सूची प्रमाणित करून मनपा कार्यालयास सादर करतील.
१०. मोशी कृषि उत्पन्न बाजार समिती बाबत मा.विभागीय आयुक्त, पुणे यांनी पारित केलेले आदेश कायम लागू राहतील. बाजार समितीतील व्यवहारांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − nine =

error: Content is protected !!
Exit mobile version