Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड मध्ये’कोरोना’बाधितांची संख्या 82 वर एकाच दिवशी 3 वर्षाच्या 2 मुलींसह...

पिंपरी चिंचवड मध्ये’कोरोना’बाधितांची संख्या 82 वर एकाच दिवशी 3 वर्षाच्या 2 मुलींसह 12 ‘पॉझिटिव्ह’

0
निगडी,दि.24 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पिंपरी चिंचवड शहरात  एकाच दिवशी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह  असल्याचे आढळून आले. निगडी रुपीनगर परिसरातील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला असुन . त्यात 7 पुरुष, ३ महिला आणि २ मुलींचा समावेश आहे. त्याचे रिपोर्ट शुक्रवारी सकाळी आले. गुरुवारी रात्री एका ३१ वर्षाच्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांची संख्या ८२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत २१ जण कोरोना विषाणुपासून मुक्त झाले आहेत तर, या विषाणूने तिघांचा बळी घेतला.निगडी रुपीनगर येथील एका २६ वर्षाच्या तरुणाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील २५ जणांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. त्यातील 7 पुरुष हे २५ ते २८ वयोगटातील आहेत. तर ३ महिला या १८ ते २४वयोगटातील आहेत. व ३ वर्षाच्या दोन लहान मुलीं आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − three =

error: Content is protected !!
Exit mobile version