Home ताज्या बातम्या जनहित चॕरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा समितीच्या अध्यक्ष पदी “सुनिल...

जनहित चॕरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा समितीच्या अध्यक्ष पदी “सुनिल पवार”

0

तळेगाव,दि.१९ फेब्रुवारी २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-सचिन कांबळे):-जनहित चॕरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती १२ मे २०२० ची कार्यकारीनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. मागील (२०१९)वर्षी संपन्न झालेल्या सोहळ्यात ज्या ज्या ट्रस्टच्या हितचिंतकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. त्यापैकी काहींना यावर्षीच्या सोहळा समितीत काम करण्याची संधी दिली असल्याचे ट्रस्टचे प्रमुख सल्लागार दादासाहेब यादव यांनी सांगितले. या प्रसंगी ट्रस्टचे महासचिव सचिन पं. कांबळे, कोषाध्यक्ष प्रविण भ.भवार तसेच ट्रस्टचे विश्वस्त संजय गायकवाड, प्रभाकर वाघमारे, सुनिल पवार, काशिनाथ भालेराव, अनिल गायकवाड, ज्योती शिंदे, संदिप ओव्हाळ, आनंद वंजारी, राजू आगळे, निलेश शिंदे, दलितानंद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

जनहित चॕरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती* १२ मे २०२० कार्यकरणीअध्यक्ष- सुनिल पवार(तळेगाव),कार्यक्रम प्रमुख- काशिनाथ भालेराव(वडगाव),उपाध्यक्ष-राहुल जाधव(आंदर मावळ) टाकावे बु. ,विपुल जाधव* (शहरी विभाग) कामशेत,प्रवीण सरोदे (नाणे मावळ) नाणोली,विजय गायकवाड(पवन मावळ)पिंपळखुटे,सचिव- मयूर यादव(कडधे),सहसचिव-कुणाल घोडके(पाटण),कार्याध्यक्ष-सुनील सोनवणे(घोणशेत),सहकार्याध्यक्ष- भाऊ साबळे(करंजगाव),खजिनदार-अमित वंजारी(नाणे),सहखजिनदार-किरण ओव्हाळ (वडगाव), संपर्कप्रमुख-गणेश गायकवाड(देवघर),गोविंद कदम(तळेगाव),महेंद्र वंजारी(कामशेत),प्रसिद्धप्रमुख-समाधान सोनवणे(साते),प्रमोद ओव्हाळ(कान्हे),तुकाराम डोळस (वडेश्वर),कायदेशीर सल्लागार समिती-ॲड. योगेश गायकवाड,ॲड. अमोल देसाई,संघटक- भागवत बि-हाडे* (तळेगांव),साजन घोडके (पाटण),विजय साबळे(करंजगाव),भावेश थोरात (मुंढावरे),दिपक शिंदे(वराळे),सिद्धार्थ गायकवाड(किन्हई),राहुल पवार(वराळे),पवन भवार(बऊर),बाळासाहेब चौरे(ताजे),गोरखसाळवे(अहिरवडे),महेश थोरात(वेल्हवळी),मारुती सोनवणे (आर्डव)

“सोहळा समिती-2020” निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल पवार म्हणाले कि, ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी माझ्यावर जो विश्वास ठेऊन किंवा गत वर्षी संपन्न झालेल्या सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात माझ्या योगदानाची पावती देऊन मला येवू घातलेल्या सोहळ्याच्या अध्यक्ष पदाची संधी दिली, त्या संधीच नक्कीच सोन करण्याचा प्रयत्न करीन. तसेच सोहळा अजून चांगल्या पद्धतिने यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 20 =

error: Content is protected !!
Exit mobile version