Home ताज्या बातम्या रावण टोळीतील सदस्य सागर परिट याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह देहुरोड...

रावण टोळीतील सदस्य सागर परिट याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह देहुरोड पोलीसांनी केले जेरबंद

0

देहुरोड,29 जानेवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रावण टोळीतील एकास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह देहुरोड पोलीस स्टेशन तपास पथकाने केले जेरबंद मागील काही दिवसांपासुन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या टोळ्यांमधील वादाचे अनुषंगाने मा.पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर सो यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना अवैध शसास्ते बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दिलेल्या सुचनांप्रमाणे देहुरोड पोलीस स्टेशन तपास पथकातील कर्मचारी पोशि सचिन शेजाळ यांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली कि, एक इसम रावेत बी.आर.टी. रोड अप्पुघर या ठिकाणी गावठी कट्टयासह फिरत आहे. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनिष कल्याणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार स.पो.नि. श्री गज्जेवार व तपास पथकातील कर्मचारी पोशि शेजाळ, पोशि परदेशी, पोशि गेंगजे, पोशि खोमणे असे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचुन रावण टोळीतील सदस्य सागर मलकारसिद्ध परिट वय 22 वर्षे रा.श्री स्वप्रपर्ती बी. फ्लॅट नं.702.1चिखली यास ताब्यात घेतले त्याचाकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली व सागर परिट च्या विरोधात देहुरोड पोलीस स्टेशन येथे दि.27 जानेवारी 2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर आरोपीस 02 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाले असुन पुढिल तपास स.पो.नि. श्री. गज्जेवार हे करीत आहेत.सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त सो श्री. संदिप बिष्णोई, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त सो परि.02 श्री विनायक ढाकणे, मा. सहा.पोलीस आयुक्त सो श्री. संजय नाईक-पाटील देहुरोड विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री मनिष कल्याणकर, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोफणे, यांचे मार्गदर्शनाखाली देहरोड पोलीस
स्टेशन तपास पथकाचे सपोनि. श्री प्रसाद गज्जेवार, पोलीस उप-निरीक्षक अशोक जगताप,पोना प्रशांत पवार, पोना प्रमोद उगले, पोना मपुर जगदाळे, पोशि सचिन शेजाळ, पोशि किशोर परदेशी, पोशि विजय गेंगजे, पोशि सुमित मोरे, पोशि संकेत घारे, पोशि विकी खोमणे यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =

error: Content is protected !!
Exit mobile version