Home ताज्या बातम्या आता मात्र 130 रुपयांमध्ये किमान 200 टि.व्ही चॅनल ग्राहकांना पाहता येणार

आता मात्र 130 रुपयांमध्ये किमान 200 टि.व्ही चॅनल ग्राहकांना पाहता येणार

0

मंबई,दि.24जानेवारी2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
मुंबई : टीव्ही चॅनेल्सच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता निर्माण करण्यासाठीच सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चॅनेल निवडीचा हक्क मिळू शकेल, असा खुलासा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणकडून (ट्राय) मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
“ट्राय’ने जारी केलेल्या निर्देशानुसार, टीव्ही वाहिन्यांच्या दरांवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. यामध्ये नेटवर्क कॅपॅसिटी फी 130 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. या शुल्कमर्यादेमुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो; तसेच दरामध्ये सुसूत्रता येऊ शकते, असे “ट्राय’चे म्हणणे आहे. “ट्राय’च्यावतीने याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र बुधवारी दाखल करण्यात आले.
“ट्राय’ने सर्व वाहिन्यांना दिलेल्या निर्देशानुसार, सुधारित दरांची माहिती 15 जानेवारीपर्यंत जाहीर करणे बंधनकारक होते; मात्र वाहिन्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. “ट्राय’चा निर्णय मनमानी असून, यामुळे वाहिन्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप केला होता. मात्र यापूर्वी वाहिन्यांनी ग्राहकांवर अकारण जादा शुल्क आकारल्यामुळे संबंधित निर्देश जारी केले आहेत, असा खुलासा ट्रायने केला. याचिकेवर पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे.
असे आहेत नवे दर?
यापूर्वी “फ्री टू एअर’ वाहिन्यांसाठी 135 रुपयांची मर्यादा होती आणि त्यापुढील आवडीच्या वाहिन्यांसाठी वेगवेगळे दर होते. आता मात्र 130 रुपयांमध्ये किमान 200 वाहिन्या ग्राहकांना पाहता येणार आहेत. त्याशिवाय स्वतंत्र वाहिन्यांच्या दरामध्येही बंधने घालण्यात आली आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − seventeen =

error: Content is protected !!
Exit mobile version