अमरावती,दि.3 जानेवारी 2020,(प्रजेचा विकास न्युज अमरावती जिल्हा प्रतिनिधी सतीश वानखडे):- असेगाव पूर्णा येथून काही अंतरावर पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले 700 ते 800 लोकसंख्या असलेले तळणी पूर्णा हे गाव..
सामाजिक क्रांतीची भूमी म्हणून ह्या छोट्याश्या गावाची ओळख आहे.
या गावातील जी. परिषद शाळेतील सुजल वानखडे नावाच्या विध्यार्थ्याने स्कॉलरशीप परीक्षेत जवळा शहापूर, विरुळपूर्णा, तळणी पूर्णा या तीन केंद्रातून 500 विध्यार्थ्या मध्ये प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळवून आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव लौकिक केले. आणि त्यांचे श्रेय तो आपल्या आई, गुरुजन वर्ग सोबतच भन्ते संघपाल जीवक यांना देतो. त्यांच्या प्रेरणेने व आशीर्वादानेच हे यश मिळविता आले असल्याचे त्याने प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
घरची परिस्तिती अतिशय बिकट व हालाकीची आई मशीन काम करून पै – पै गोळा करून आम्हा दोन भावंडांना शिक्षणासाठी जे पाहिजे ते देऊन उपजीविका चालविते व घर सांभाळते.
आईकडे पुस्तके विकत घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. तेव्हा शाळेतील शिक्षकानी माझी अभ्यासा विषयीची तळमळ बघून पुस्तके विकत घेऊन दिली. इतकेच नाही तर माझ्या पासून रोज अभ्यास सुद्धा करून घेऊ लागले. शिक्षकाची मेहनत आज सफल झाली. केंद्रामधून प्रथम येण्याचा मान हा माझ्या आईच्या मेहनतीचे, शिक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाचे, सोबतच भन्ते संघपाल जीवक यांचे फळ असून त्यांच्या आशीर्वादा मुळेच हे मला शक्य झाले असल्याची कबुली सुजल वाणखडे याने न्यूजला बोलतांना दिली. मला पायलट व्हायचे आहे त्या करिता मी खूप अभ्यास करुन माझ्या आई चे स्वप्न पूर्ण करेल हे सुद्धा बोलून दाखविले. प्रथम क्रमांका ने आल्या मुळे गावात सर्वत्र खूप कोतुक होत आहे. तसेच भन्ते संघपाल जीवक यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला आणि भन्ते जीवक यांनी शिक्षकां विषयी ची धारणा मांडताना विद्येच्या मंदिरातील प्रत्येक शिक्षक मनाने पवित्र आणि निर्मळ असावेत अशा मोठ्या मनाच्या आणि माणुसकी जपणाऱ्या शिक्षकांना सुद्धा सलाम असून सर्वांचे मंगल होवो अशी सर्वाणप्रति मंगल कामना तथागता चरणी मागितल्या..