Home ताज्या बातम्या वायसीएमएच मधील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदी पारदर्शक नाही-आमदार अण्णा बनसोडे

वायसीएमएच मधील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदी पारदर्शक नाही-आमदार अण्णा बनसोडे

0

पिंपरी,दि.7 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) वायसीएम रुग्णालयाचे व्यवस्थापन मानधनावरील डॉक्टरांकडे आणि पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांची नेमणूक हा विरोधाभास आहे. पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांच्या नेमणूकीमुळे महानगपालिकेच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वाढणारा आर्थिक बोजा महापालिका प्रशासन करदात्या नागरिकांवरच टाकणार आहे. सेवेत सुधारणा करण्याऐवजी मनपा प्रशासन व पदाधिकारी औषध खरेदी आणि डॉक्टर भरतीत मश्गुल आहेत. हि भरती प्रक्रिया व वायसीएमएच मधील औषध व साहित्य खरेदी पारदर्शक नाही. याबाबत आपण आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करु असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे.
वायसीएमएचमध्ये पी.जी. इन्स्टिट्युटसाठी 103 डॉक्टर प्राध्यापकांची कायमस्वरुपी पदे भरण्यासाठी मुलाखती सुरु आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा वाढणार आहे. याबाबत माहिती मागणारे पत्र आ. अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णालयीन सेवेचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने या ठिकाणी महापालिकेच्या वतीने पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय (P.G.INSTITUTE) सुरु करण्यासाठी डॉ. श्रीकर परदेशी महापालिकेचे आयुक्त असताना शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अडीच वर्षांपुर्वी महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर प्रशासनाने व पदाधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. 750 खाटांच्या रुग्णालय व्यवस्थापन मागील अनेक दिवसांपासून मानधनावरील डॉक्टर सांभाळत आहेत. आता पी.जी. इन्स्टिट्युट सुरु करण्याची पुर्व तयारी म्हणून 103 डॉक्टर प्राध्यापकांची कायमस्वरुपी पदे भरण्यासाठी मुलाखती सुरु आहेत. वायसीएम रुग्णालयाचे व्यवस्थापन मानधनावरील डॉक्टरांकडे आणि पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांची नेमणूक हा विरोधाभास आहे. पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांच्या नेमणूकीमुळे महानगपालिकेच्या तिजोरीवर कायमस्वरुपी कोट्यांवधी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वाढणारा आर्थिक बोजा महापालिका प्रशासन करदात्या नागरिकांवरच टाकणार आहे, हि भरती प्रक्रिया व वायसीएमएच मधील औषध व साहित्य खरेदी पारदर्शक नाही, असेही आ. अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 12 =

error: Content is protected !!
Exit mobile version