Home ताज्या बातम्या अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध

अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध

0


मुंबई,दि.23 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. अजित पवारांविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तर अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले. तर कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध केला. दरम्यान, त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ठाण्यात उमटल्या. संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले.

शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आमदारांना फसवून राजभवनात नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर आधीच संतप्त झालेले कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले.

तसेच, त्यांच्या प्रतिमेला काळे फासून ती जाळण्याचाही प्रयत्न केला. वेळी मिलिंद पाटील यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार यांनी अत्यंत मेहनतीने मिळवलेले हे यश धुळीला मिळवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला असल्यानेच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या आंदोलनातून व्यक्त केल्या. तर नेतेच असे करतात तर कार्यकर्त्यांनी काय करायचे कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचे काम अजितदादा यांनी केले आहे. आम्ही शरद पवारांच्या मागे उभे आहोत असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महापालिका गटनेता कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला. तर निषेध व्यक्त करणाऱ्या जव्वाद डॉन आणि उमेश बोरगावकर कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version