मुंबई,दि.10नोव्हेबंर2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)
मागील १५ दिवसानापासून सुरु असलेला सत्तेचा तिढा सोडण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर भाजपच्या कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीनंतर भाजपच्या कोर कमिटीने राज्यपालांची भेट घेतली असून त्यानंतर भाजप सरकार स्थापन करणार नसल्यचे जाहीर केले आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली आहे. या मध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले कि, महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लावधावली होती.जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ता स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत.
तसेच जर शिवसेनेला जर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बरोबर जाऊन सत्ता स्थपन करायची असेल तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. असे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखीनच वाढला आहे.
आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुढील हालचाली काय असतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.