Home मावळ राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना रामोशी समाजाचा पाठिंबा

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना रामोशी समाजाचा पाठिंबा

0

तळेगाव, दि. १९ आॅक्टोबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – मावळ तालुक्यातील रामोशी समाज बांधवांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना पाठिंबा दिला.
मावळ तालुक्यातील रामोशी समाजाच्या वतीने शेळके यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते किशोर भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंब्याचे पत्र देताना प्रदीप म्हसुडगे, नथू वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, विनायक वाघमारे, खंडू चव्हाण, मयूर चव्हाण, संतोष चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,पोपट चव्हाण, नितीन शेळके, गोरख चव्हाण, राहुल शेळके, उमाताई शेळके, अनिकेत माकर तसेच रामोशी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच रामोशी समाजाच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहिला आहे. समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच आहेत. भाजप सरकारच्या काळात सुटतील, असे वाटले होते, पण रामोशी समाजाला भाजप सरकारने दुर्लक्षित केले, असा आरोप यावेळी करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातील सर्व रामोशी समाज सुनीलआण्णा यांना विक्रमी मतांनी निवडून देतील, असे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − four =

error: Content is protected !!
Exit mobile version