तळेगाव, दि. १३ आॅक्टोबंर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) : – मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके मूळचे उद्योजक आहेत. कोणतेही पद नसताना त्यांनी शेकडो तरुणांना नोकरी दिली आहे. दिलेला शब्द पाळण्याची धमक केवळ सुनिल अण्णांमध्येच आहे. त्यामुळे नेतृत्वाची एक संधी दिल्यास मावळ तालुक्यातील ५ वर्षात २५ हजार तरुणांना नोकरीचे वचन देणाऱ्या सुनीलआण्णा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय तालुक्यातील तरुणांनी घेतला आहे.
रविवारी नाणे मावळातील मतदारांशी संवाद साधताना सुनिल शेळके म्हणाले की, तरुण बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मावळ तालुक्यात तसेच परिसरात अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत. त्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. मावळात व्यावसायिक प्रशिक्षण व तंत्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ. मावळातील कंपन्यांनी कामगार भरतीमध्ये तालुक्यात राहणाऱ्या तरुणांनाच प्राधान्य द्यावे, यासाठी आग्रही भूमिका घेईन. त्याबरोबरच तालुक्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठीदेखील प्रोत्साहन देणार आहे. माझा पराभव करण्यासाठी दोन दोन मुख्यमंत्र्याना यावे लागत आहे, याला काय म्हणावे? मी नोकरी देणार असल्याचा विश्वास इथल्या तरुणवर्गाला आहे, त्यामुळेच तरुण माझ्या पाठीशी आहेत. त्यावेळी इथल्या तरुणाईनेही उत्स्फूर्तपणे ‘अण्णा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत,’ अशी ग्वाही त्यांना दिली.
नाणे मावळातील मुंढावरे, फांगणे, टाकवे खुर्द, शिलाटणे, दहिवली, वेहेरगाव, कार्ला, वाकसाई या गावांचा दौरा करून शेळके यांनी मतदारांशी संवाद साधला. सर्व गावांमध्ये शेळके यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शिलाटणे गावातील तरुणांनी सुनील आण्णांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली काढली होती. या प्रचार दौऱ्यात शेळके यांच्या समवेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती बाळू भानुसघरे ,पंचायत समिती सदस्य महादू उघडे, नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू देवकर, माजी सरपंच किरण हुलावळे, नंदू हुलावळे, कैलास हुलावळे, बाळू हुलावळे, सतीश सावळे, राजू हुलावळे, सचिन वाडेकर, नितिन वाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंढवरे येथे शंकर वाघमारे, सदाशिव वाघमारे, नजु वाघमारे, गबाजी वाघमारे, तानाजी वाघमारे, नथु वाघमारे, कैलास वाघमारे, मच्छिंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर पवार, हरीश उंबरकर, शुभम गायकवाड, भावेश थोरात यांनी शेळके यांचे स्वागत केले. फांगणे येथे माजी सरपंच संजय गरुड तसेच बजरंग गरुड, सचिन मालुसरे, प्रतीक गरुड, दत्ता मालुसरे, दत्ता वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले. टाकवे खुर्द गावात माजी सरपंच नवनाथ गायकवाड तसेच बाळू गायकवाड, संपत गरुड, सुनीता गायकवाड, मधुकर गरुड, बाळू ढमाले, एकनाथ गरुड, भाऊ गरुड, सुधीर गरुड, संदीप गरुड, राहुल गरुड, अक्षय देशमुख, चंद्रकात गरुड, शंकर गावडे, तुषार पिंगळे राजू गावडे, संभाजी गरुड, प्रमोद धुमाळ, दत्ता गरुड आदींसह नागरिकांनी सुनिल आण्णा यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दिला.
वाकसाई येथे सरपंच दीपक काशीकर, जिल्हा परिषद सदस्य कुसुम काशीकर, ज्ञानेश्वर काशीकर, सरपंच काशीकर, भारतभाऊ येवले, सदस्य कैलाश काशीकर, अमोल शेलार, खंडू केदारी, संदीप काशीकर, रामभाऊ काशीकर, मल्हारी केदारी, बाळू शेलार, सुरेश खीरे, विजय शेलार, सूरज चांदणे, अशोक देशमुख, धोंडू केदारी, बेबी शेलार, नीलम शेलार, संगीता देशमुख, शिल्पा शेलार, मालाबाई शेलार, देहू शिंदे, वंदना दहिभाते, सुरेश शेलार, एकनाथ शेलार, महादू उघडे, मारुती येवले, रघु आहेर, अमोल केदारी, नरेश येवले, राजश्रीताई राऊत, खंडू येवले, बाळासाहेब येवले, पूनम येवले आदींसह नागरिकांनी सुनिल आण्णा यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दिला.