पिंपरी,दि 9 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- थेरगाव भागात महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांचा एकही बुथ लावू देणार नाही. या भागातील एक-एक मत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मिळेल. येथील जनता सुज्ञ आहे. ही जनता नेहमी विकासालाच मत देते. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे यांनी बुधवारी (दि. ९) व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त सर्व थेरगाव ग्रामस्थांची थेरगामधील कैलास मंगल कार्यालयात बैठक झाली. यावेळी स्वतः आमदार जगताप, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसेविका अर्चना बारणे,
माजी नगरसेविका विमल जगताप, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, संतोष बारणे, भाजपचे किवळे मंडल अध्यक्ष काळुराम बारणे, पोलिस पाटील नितीन बारणे, बापुजी बुवा पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर बारणे, पदमजी पेपर मील युनियन लीडर बाळासाहेब पवार, वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य संभाजी बारणे, अॅड, दिनकर बारणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे, प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे, युवानेते तानजी बारणे, बाळासाहेब जगताप, राहुल घोगरे, हनुमंत बारणे, राजू पवार, दिलीप पवार, हभप मारुती बारणे, झामा तात्या बारणे, बाळासाहेब पवार, कांतीलाल गुजर, सोमनाथ गुजर, दीपक गुजर, दीपक बारणे, फकिरा जगताप यांच्यासह थेरगाव ग्रामस्थ व भागातील बारणे, गुजर, पवार, जगताप, घोगरे कुटुंबिय उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही निवडणूक विकासाची असल्याचे सांगितले. तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभारण्याचे बळ मला मिळाले. आतापर्यंत मतदारसंघात मोठी विकासकामे झाली आहेत. त्यातून थेरगाव परिसराचा चेहरामोहरा बदलला असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे यांनी थेरगावचा प्रत्येक नागरिक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यामुळे या भागातील बुथवर विरोधकांचा एकही बुथ लावू देणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आमदार जगताप यांना थेरगावमधून शंभर टक्के मतदान होईल. विरोधकांच्या पारड्यात काहीच मते पडणार नाहीत, असा आम्हाला विश्वास नाही तर पूर्ण खात्री असल्याचे ते म्हणाले.