पिंपरी,दि 9 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भाजपचे पिंपरी विधानसभा मुख्य संयोजक राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आकुर्डी येथील सिझन हॉलमध्ये आज पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे ३९९ बुथ चालक, ९० शक्तीकेंद्र प्रमुख यांची समन्वय बैठक पार पडली. आमदार व महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, भाजपचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सेना-भाजपचे चौदा नगरसेवक तसेच पंधरा कोअर कमिटी मेंबर व महायुतीतील पक्षांचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी महायुतीची ताकद शहरात एकत्रितपणे तीनही उमेदवारांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करण्यात आला. राजू दुर्गे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भाजपच्या ताकदीचा प्रत्यय विरोधकांना या निवडणूकीत येऊन त्यांची निकालानंतर दातखिळी बसल्याशिवाय राहणार नाही, इतके मजबूत संघटन भाजपचे या मतदारसंघात निर्माण झाले असल्याचे म्हटले.
आमदार चाबुकस्वार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, संपूर्ण पुणे व पिंपरी चिंचवडमधून एकमेव पिंपरीची जागा सेनेच्या वाटयाला आली असून आज भाजप थोरल्या भावाच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट करून महायुतीचे संघटन व ताकदीचा आगामी काळात सर्वांना न्याय देण्यासाठी आमदारकीचा मी वापर करीन अशी ग्वाही यावेळी दिली.
तुकाराम जवळकर यांनी आभार मानले.