पिंपरी,दि.१ आॅक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीला पुणे जिल्ह्यात बसणार मोठा फटका वंचित बहुजन आघाडी सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे आणि लोकांसमोर एक पर्याय म्हणून लोकसभेमध्ये उभा राहीला लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ला यश जरी मिळालं नसलं तरी मतांच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने लोकांची मने जिंकली आहेत वंचित बहुजन आघाडी ने स्वतःची ताकद दाखवत काँग्रेसलाही धक्का दिला तर त्यानंतर आगामी विधानसभा मध्ये एम आय एम हे वंचित बहुजन आघाडीतून वेगळे झाले त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोमर एमआयएमचे उमेदवारही असणार आहे,त्यात तिकिटाचा बाजारीकरण उमेदवार निश्चित करताना व्यवस्थित चाचपणी न करता उमेदवारांना संधी व स्थानिक उमेदवार संधी न दिल्या कारणाने,उमेदवारांची व्यवस्थित चाचपणी न करून ज्या कमिटीकडे काम दिलं होतं त्यानी स्थानिक कार्यकर्त्याशी चर्चा न करता उमेदवार दिल्याने व काही जुने बडे नेते व आता पडळकर गोपीचंद व काही नेते हे वंचित मधून बाहेर पडल्याने वंचितच्या उमेदवारांच्या निवडीबाबत मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाल्या कारणाने वंचित बहुजन आघाडी पुणे पिंपरी चिंचवड मावळ मुळशी खेड आळंदी आशा पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मधून मोठ्या प्रमाणात वंचित मधून मोठा गट बाहेर पडणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडी च्या बड्या नेत्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली आगामी विधानसभेमध्ये लोकसभेत प्रमाणे विधानसभेमध्ये ही मते पडतील यावर प्रश्नचिन्ह आहे त्यात वंचित मध्ये हा मोठा गट बाहेर पडणार आहे त्याचा फटकाही वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात पडणार आहे हा मोठा गट पुरोगामी विचारांच्या पक्षासोबत जाणार व किंवा सर्व पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार देणार अशी माहिती देण्यात आली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुणे जिल्ह्यात जरी दिसले तरी निवडून येण्यासाठी पारड जड जाणार, पिंपरी चिंचवड भोसरी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील उमेदवार वंचित बहुजन आघाडी ला उमेदवार मिळतील मात्र निवडून येण्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह वंचित बहुजन आघाडी च्या एका गटाने निर्माण करून दिला आहे