Home ताज्या बातम्या झोपडपट्टीतल्या नेतृत्वाला पिंपरी विधानसभेचा आमदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता

झोपडपट्टीतल्या नेतृत्वाला पिंपरी विधानसभेचा आमदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता

0

पिंपरी,दि.२५ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पिंपरी विधान सभेतील झोपडपट्टीतल्या नेतृत्वाला आमदार होण्याची संधी मिळणार का दिपक ऊर्फ बाळू जगताप राहणार चिंचवड आनंद नगर मध्ये हे वंचित आघाडीचे इच्छुक उमेदवार, मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ही आहे की वंचित बहुजन आघाडी कडून दिपक जगताप यांना तिकीट मिळणार का कारण पिंपरी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी चा वाढता जोर पाहता वंचित बहुजन आघाडी कडून अनेक जण आपल्या स्वतःला आजमावून बघण्याचा प्रयत्न करत आहे पण वंचित बहुजन आघाडी खरंच वंचित घटकातल्या नेतृत्वाला संधी देणार का असा सवाल दीपक जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून व मतदारसंघातून बाहेर येत आहे दीपक जगताप यांना जर वंचित बहुजन आघाडी कडून तिकीट न मिळाल्यास त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसण्याची शक्यता आहे दीपक जगताप हे जरी झोपडपट्टीत राहत असले तरी सर्व समाजातल्या कार्यक्रमात त्यांचा मोलाचा वाटा असतो पडदा पुढे येणाऱ्या नेतृत्व वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून पडद्या पुढे येण्याची संधी मिळेल त्यामुळे दिपक जगताप यांना वंचीतचे तिकिट मिळण्याची शक्यता आहे का दिपक जगताप यांच्या वडिलांपासून आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय सक्रिय आहेत. दिपक जगताप यांची अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती,सर्व समस्याची जाणीव, मतदारांना आपलंसं करून टाकणारे वक्तव्य याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला नक्कीच होईल दिपक जगताप यांना जर संधी मिळाली तर नक्कीच वंचित बहुजन आघाडी ला फायदा होईल पिंपरी विधानसभे मधून अनेक जण आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहते, यंदा वंचित बहुजन आघाडी जास्त मतधिक्क मिळवेल आणि वंचित बहुजन आघाडी चा पिंपरी विधानसभा जिंकण्याचे चित्र सध्या दिसत आहे पिंपरी विधान सभे मध्ये सर्व समाजामध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीचा क्रेझ आहे याचा फायदा नक्कीच वंचित बहुजन आघाडीला मिळेल, पिंपरी विधानसभेमध्ये सर्वांचे लक्ष दिपक जगताप यांना वंचित बहुजन आघाडी चे तिकीट मिळेल का याकडे लागले आहे काही दिवसात चित्र स्पष्ट होईल वंचित बहुजन आघाडी विधानसभेचे तिकीट कोणाच्या पारड्यात पडेल हे समोर येईल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 19 =

error: Content is protected !!
Exit mobile version