Home ताज्या बातम्या ‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या...

‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन होणार

0


नवी दिल्ली, ,दि.04 सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत प्रकाशनविभागाने ‘लोकतंत्र के स्वर (खंड -2 ‘ आणि ‘द रिपब्लिकन एथिक (आवृत्ती 2) ‘ या पुस्तकांची निर्मिती केली आहे. राष्ट्रपती म्हणूनदुसऱ्या वर्षी (जुलै 2018 ते जुलै 2019).राष्ट्रपती कोविंद यांनी केलेल्या 95 भाषणे यात संकलित करण्यात आली आहेत.

या भाषणांमध्ये आपल्या राष्ट्रीय जीवनाचे विस्तृत दर्शन आहे ज्यामध्ये मुत्सद्देगिरीपासून सुशासनापर्यंत,दर्जेदार शिक्षणापासून तेउत्कृष्टतेच्या ध्यासापर्यंत आणि आपल्या शूर सैन्यदलाच्या कल्याणापासून ते संविधानाच्या महत्वपूर्ण भावनेपर्यंतच्या मुद्यांचा समावेश आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त गांधीजींच्या जागतिक दृष्टिकोनाशी संबंधित राष्ट्रपतींच्या प्रखरसंबोधनांचा स्वतंत्र विभागदेखील यात समाविष्ट करण्यात आला आहे.

ही भाषणे 8 प्रकारांमध्ये विभागण्यात आली आहेत: ‘ऍड्रेसिंग द नेशन ‘, ‘विंडोज टू द वर्ल्ड, ‘एजुकेटिंग इंडिया: इक्विपिंग इंडिया’, ‘धर्मऑफ पब्लिक सर्विस’, ‘ऑनरिंग अवर सेंटिनेल्स’, ‘स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ ‘, ‘एक्नॉलेजिंग एक्सलन्स’ आणि ‘महात्मा गांधी: मॉरल एक्झेम्प्लर- गायडींग लाईट’.

6 सप्टेंबर रोजी प्रवासी भारतीय केंद्र, नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होईल. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि थावरचंद गहलोत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 16 =

error: Content is protected !!
Exit mobile version