देहुरोड,दि.३१आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिनांक 30 ऑगस्ट 2019 रोजी रात्री साडेनऊ वाजता कार्यालय बंद केल्यापासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.30वा दरम्यान देहूरोड बाजार येथील भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालयात असलेल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या फोटो असलेल्या बॅनर ला कोणीतरी समाजकंटकांनी शेण लावले होते सदर बाबत श्री सूर्यकांत भीमराव सुर्वे यांनी देहूरोड पोलीस स्टेशनला अज्ञात समाजकंटकांन विरोधात फिर्याद दिली होती त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या घटनेचे गांभीर्य ओळखून देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कल्याणकर यांनी आदेश दिल्याने डीबी पथकाने ठिक ठिकाणी बातमीदार नेमून तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार सावंत व पोलीस नाईक उगले यांना गुप्त बातमीदार मार्फत सदरचा गुन्हा हा 2 विधिसंर्घपीत बालकांनी केल्याबाबत समजले त्यांची नावे कळल्याने त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीने सदरचे कृत्य अनावधानाने केलेले आहे असे निष्पन्न झाले आहे तरी सविस्तर तपास पुढे चालू आहे सदरचे कामगिरी आर के पद्मान साहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,श्री रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त ,श्री विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय नाईक पाटील, देहूरोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे शाहिद पठाण साहेब, पोलीस निरीक्षक,मनोज पवार पोलिस उपनिरीक्षक सहायक, फौजदार सुभाष सावंत, प्रमोद उगले पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल किशोर परदेशी पोलीस कॉन्स्टेबल विकी खोमणे यांनी केली आहे.