बीड,दि.३०आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केज राखीव मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडी स्वछ आणि सुशिक्षित चेहरा घेऊन येणार असे संभावित आहे. सर्वत्र सध्या मतदारांची सुशिक्षित चेहऱ्यास पसंती दिसून येत आहे मतदार हा जागा झाला असून स्वच्छ आणि आपल्यासाठी खंबीर पणे बाजू मांडणारा चेहऱ्यास पसंती देतात हेच दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीची मतदारातील वाढती पंसती आणि उमेदवाराचं वाढत प्रतिसाद बघता वंचीत आघाडी उमेदवार निवडीस घाई करत नाहीत. पक्षाची उमेदवार पारखून आणि निरखून निवडण्याची पद्धत हि सगळ्याना माहित आहे. अशातच केज राखीव मतदार संघासाठी आणि विविध नावांची चर्चा सुरु झाली.असली तरी डाॅ.संतोष तावरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे,केज मतदार संघातील विविध पक्षातील उमेदवार आपल्याला सध्याच्या पक्षाचे नेते माजी आमदार वंचित कडून उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत, वंचित बहुजन आघाडीतून विविध उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि केज मतदार संघात उमेदवारी च्या चर्चेला उधाण आले आहे.
वंचित बहुजन आघाडी तर्फे सुशिक्षित आणि स्वच्छ चेहरा शोधला जात आहे. सध्या चर्चेत असलेले वंचित चे उमेदवार आणि त्यांचा राजकीय इतिहास यावर केज मतदार संघातील जनता नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.