Home अमरावती ग्रामसेवकानी पळ काढल्याने गावकरी अनुत्तरित

ग्रामसेवकानी पळ काढल्याने गावकरी अनुत्तरित

0

अमरावती,दि.२५आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास आॅनलाईन न्यूज प्रतिनिधी- सतीश वानखडे जिल्हा प्रतिनिधी अमरावती ):- टाकरखेडा शंभू येथे दिनांक 23/08/2019 शुक्रवार ला आमसभा ठरविण्यात आली ठरविल्या प्रमाणे गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. ग्रामसभेचे विषय ठरविण्यात आले आणि त्या मध्ये गावामधील तंटामुक्ती समिती बरखास्त करून नवीन समिती आणि अध्यक्ष स्थापन करण्यात आली. तसेच सरकारी स्वस्त धान्याची दक्षता समिती मध्ये नवीन सदश्याची नोंद करण्यात आली.नाली साफ सफाई संदर्भात 90,000 रुपये दाखविण्यात आला तेव्हा गावकऱ्यानी नाली सफाईचे कामे झालेलेच नाही यावर ग्रामसेवक आणि अध्यक्ष यांनी माफी मागून पुन्हा नाली साफ सफाईचे कामे करण्यात येईल असे गावकर्यांना आश्वासन दिले.. त्याचप्रमाणे 2016 ते 2019 पर्यंतचा वित्त आयोगाचा खर्च आणि जमा निधी बाबत चर्चा करीत असताना प्रवासी निवास बांधण्यात आला होता पण तो बेकायदेशीर पणे आठवडी बाजार येथे बांधण्यात आला यावर विचारले असता अध्यक्षानी मला या बाबत काहीही माहिती नसल्याची उत्तरे दिली. तेव्हा ही कामे कोनाच्या सहीने किव्हा कुणाच्या देखरेखी खाली होत आहे असा प्रश्न गावकर्यांना पडल्याचे दिसून येत आहे .
सामान्य फंड तसेच 14 वित्त आयोगाच्या निधींबाबत विचारले असता ते उत्तर देण्यास टाळाटाळ करीत होते. शौचालया बाबत विचारले असता शौचालय उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींना देऊन त्यांचे पैसे रीतसर चेक द्वारे काढण्यात आले त्याचे उत्तर मागितले असता ग्रामसेवक उत्तर न देता ग्रामसेवकानी आंसभेमधून पळ काढला.. अध्याक्षाना ग्रामसेवकन सांगता निघून गेल्याचे विचारले असता आमसभा बरखास्त झाली आहे असे सांगण्यात आले पण गावकरी मोठ्या संख्येने तेथे उपस्तीत असून आमसभा सुरूच होती. तेव्हा ग्रामसेवकांनी आम्हच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी यासाठी ते कट्टीबद्ध आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version