Home ताज्या बातम्या श्रेयवादासाठी उद्घाटनाची ‘लगीनघाई’ राष्ट्रवादी शहराध्यक्षांची खेळी ः पिंपरीगावात वाघेरे-वाघेरेंमध्येच जुंपली

श्रेयवादासाठी उद्घाटनाची ‘लगीनघाई’ राष्ट्रवादी शहराध्यक्षांची खेळी ः पिंपरीगावात वाघेरे-वाघेरेंमध्येच जुंपली

0

पिंपरी, दि. 23 आॅगस्ट 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): –  महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही ‘भिजत घोंगडे’ ठरलेल्या पिंपरीगावातील विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी घातला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकाळातील मंजूर कामांच्या उद्घाटनाची लगीनघाई करून राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी अकलेचे तारे तोडल्याचा आरोप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे वर्षानुवर्षे ही कामे मार्गी लावण्यात संजोग वाघेरे यांना यश आले नाही. संदीप वाघेरे यांनी मार्गी लावलेली कामे संजोग वाघेरे उद्घाटन करणार असल्याने पिंपरीगावातील राजकीय वातावरण तापले आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उंबरठ्यावर असल्याने विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटनांची ‘लगीनघाई’ सुरू आहे. पिंपरीगावातील शिवछत्रपतींच्या स्मारकाचे भूमिपूजन, हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण, जिजामाता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या ओपीडीचे उद्घाटन, श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार कामाचा भूमिपूजन सोहळा उद्या (दि. 24) आयोजित केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे महापालिकेच्या खर्चातून करण्यात आली. या प्रभागाचे नेतृत्व चार नगरसेवक करीत असताना संजोग वाघेरे यांच्या पत्नी नगरसेविका उषा वाघेरे यांनी स्वतःच्याच नावाने प्रसिद्धी पत्रक दिले. संजोग वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते ही उद्घाटने पार पाडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे पॅनलमधील अन्य तीन नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी याविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, संजोग वाघेरे हे माजी महापौर आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांची ही तिसरी ‘टर्म’ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळूनही त्यांना प्रभागाचा विकास साधता आला नाही. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण काळभैरवनाथ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राँझ मधील सिंहसनाधिस्त पुतळा उभारणे व त्यावर मेघडंबरी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी सुनिता वाघेरे यांनी 2012 साली पुतळा सुशोभिकरणाची मागणी केली होती. पुतळ्याच्या सुशोभिकरणाची 50 लाख रुपयांची निविदा 2013 साली महापालिकेने मंजूर केली. मात्र वाघेरे यांनी हे काम त्यांच्याच ठेकेदाराला मिळवून देत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी भिकू वाघेरे यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी 47 लाख रुपयांचा खर्च केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम गेली पाच वर्षे रेंगाळले होते. ते आपण पाठपुरावा करून पूर्ण केले.हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्याची सिंधी समाज बांधवांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी होती. सिंधी बांधवांनी यासाठी 2006 मध्ये पालिकेशी पत्र व्यवहार केला. मात्र नगरसेवक या नात्याने उषा वाघेरे या हे काम यशस्वी करू शकल्या नाहीत. तब्बल 11 वर्षे हे काम झाले रेंगाळले. मी नगरसेवक झाल्यानंतर पत्रव्यवहार करून कलानी यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लावला. त्यासाठी आवश्यक सगळ्या मान्यता आपण मिळवून घेतल्या. पिंपरी कॅम्पमधील पुतळा समितीने हेमू कलानी यांचा अर्धपुतळा तयार करुन तो महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. जिजामाता रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याबाबत अनेकदा आपण मागणी केली. फर्निचरच्या कामाचा विषय मी स्वत: मंजूर करून घेतला. संजोग वाघेरे व उषा वाघेरे ‘आयत्या पीठावर रेघोट्या’ मारण्यासाठी सरसावले आहेत. ज्यांना सत्ता असताना विकासकामे करण्यात यश आले नाही, ती सर्व कामे आम्ही करून घेतली मात्र स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाघेरे यांनी चालविलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून जनता ‘त्यांना’ चांगलीच ओळखून असल्याचा आरोपही संदीप वाघेरे यांनी केला आहे.तर पिंपरी गावातील काळभैरवनाथ मंदिराच्या दुरुस्तीचे काम संजोग वाघेरे यांनी मंजूर करून घेतले होते. गावातील नागरिकांची मागणी हे मंदिर नव्याने उभारण्याची होती. हे मंदिर नव्याने उभारण्याची मागणी आपण मंजूर करून घेतली. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मंदिराच्या बांधकामाचा खर्च महापालिका करणार असून कळसाच्या कामाचा खर्च स्वत: संदीप वाघेरे करणार आहेत. असे असतानाही या मंदिराच्या कामाचे उद्घाटन संजोग वाघेरे हे आपल्या वाढदिवसा दिवशी करून श्रेय लाटत असल्याचा आरोपही संदीप वाघेरे यांनी केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven − 11 =

error: Content is protected !!
Exit mobile version