Home ताज्या बातम्या भारत बांगलादेश सीमेवरील सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट संचालन सुरु करावे –...

भारत बांगलादेश सीमेवरील सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट संचालन सुरु करावे – केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले

0

कोलकातादि.२२ आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी वाघा बॉर्डर येथील बीटिंग द रिट्रीट समारोहाच्या संचलनाची परंपरा आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर प्रमाणे भारत बांगलादेश सीमेवरील सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट समारोहाच्या संचलनाची प्रथा सुरु करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. आज ना. आठवले यांनी भारत बांगलादेश सीमेवरील सुतारकंडी येथे भेट दिली. तेथील (बी एस एफ) सीमा सुरक्षा दलाच्या मिलिटरी कॅम्प ला भेट देऊन जवानांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट समारोह सुरु करण्याची स्थानिक जनतेची मागणी असल्याची माहिती पुढे आली. भारत बांगलादेश सीमेवर बीटिंग द रिट्रीट समारोह सुरु करण्यासाठी भारताचे संरक्षण मंत्री ना. राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी सुतारकंडीतील स्थानिकांना दिले.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. हा दौरा आटोपून ते आसाम मधील करीमगंज येथे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दिव्यांगजणांना सहाय्यक वस्तूंच्या वाटप सोहळ्यात जाताना वाटेत सुतारकंडी या गावाला भेट दिली. भारत बांगलादेश सीमा असलेले सुतारकंडी हे गाव आहे. भारत बांगलादेश च्या सुतारकंडी सीमेवरील चेक पोस्ट वर बीटिंग द रिट्रीट समारोहाचे प्रथा सुरु करावी ही येथील जनतेची मागणी आहे. या बीटिंग द रिट्रीट समारोहाचे संचालन पाहण्यास येथे पर्यटकांची गर्दी होऊ शकते त्यामुळे सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट समारोहाची प्रथा सुरु करण्याच्या मागणीसाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आपण भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =

error: Content is protected !!
Exit mobile version