Home ताज्या बातम्या लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा

0

मुंबई, दि. 30 जुलै 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने 1 आॅगस्ट 2019 रोजी अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली आहे.

मुंबईतील ब्रांदा येथील रंगशारदा सभागृहात गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार सुधारक भालेराव यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि अण्णा भाऊंना मानणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, “कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच साहित्य प्रकार समुध्द करणारे साहित्यरत्न म्हणून अण्णा भाऊंनी ओळख आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय त्यांना जाते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी जागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान मोलाचे आहे.  अशा साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणा-या लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीची सुरुवात १ ऑगस्टपासून होत आहे. त्याच निमित्ताने हा टपाल तिकिटाचा ऐतिहासिक सोहळा होत आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे”.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + nine =

error: Content is protected !!
Exit mobile version