Home ताज्या बातम्या दुःख वार्ता-काळाच्या पडद्याआड;दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते...

दुःख वार्ता-काळाच्या पडद्याआड;दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे निधन

0

मंबई,दि.१६जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. 16 जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ;मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
80 च्या दशकात जातीवादी, धनदांडग्या प्रस्थापित लोकांच्या मनात ज्यांनी धडकी भरवली, ज्यांचं केवळ नाव ऐकून जातीवादी लोकांचा थरकाप व्हायचा, जातीवादी लोकांना पळता भुई कमी व्हायची, महाराष्ट्रात कुठेही गोर-गरीब, दिन-दुबळ्या, उपेक्षित, बहिष्कृत कष्टकरी समाजावर अन्याय अत्याचार झाला की जातिवाद्याविरोधात दंड थोपटून बंड करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी व वेळप्रसंगी शासन-प्रशासनाची तमा न बाळगता जातिवाद्यांना जशास तसे उत्तर देणारी आंबेडकरवादी तरुणांची अतिशय आक्रमक अशी संघटना अर्थात #दलितपँथर” स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे, दलित पँथर चे संस्थापक सदस्य, नेते, दलित पँथर ची थिंक टॅंक, दलित पँथर संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे, सोबतच आंबेडकरवादी चळवळीला वैचारिक खाद्य पुरवणारे, साहित्यिक, लेखक, उत्तम वक्ते, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते पँथर मा. राजा ढाले हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे चळवळीसाठी खर्ची केलं अशा या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या आनुयायाला मनोभावे, अश्रूनायनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × three =

error: Content is protected !!
Exit mobile version