Home ताज्या बातम्या विजबिल ठेकेदार यांचा मनमानी कारभार ! रुपीनगर शाखा शिवसैनिकांचा अंदलोनाचा इशारा

विजबिल ठेकेदार यांचा मनमानी कारभार ! रुपीनगर शाखा शिवसैनिकांचा अंदलोनाचा इशारा

0

निगडी,दि-१५जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
रुपीनगर, तळवडे व प्राधिकरण भागात चुकीच्या पद्धतीने विजेची बिले काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणेबाबत व वारंवार लाइट जान्या संदरभात आज मा.मिलींद चौधरी अतिरिक्त कार्यकारी अभियंता .म.रा.वि.वि.कं.मर्या.
प्राधिकरण, पुणे-४४ यांना निवेदन दिले,रुपीनगर, तळवडे याभागात दि. १०/७/१९ पासून माहे जुलैच्या रिडींग ला सुरुवात होत असून मागील काही महिन्याचा वीज बिलांचा आढावा घेतला असता असे दिसून आले आहे कि ७० % हुन अधिक फोटो हे अस्पष्ट दिसत आहेत यामुळे प्रमाणीकरण (validation) करता येणे शक्य नाही. त्याचात सदरचा ठेकेदार हा महिन्याच्या महिन्याला रीडिंग घेत नाही. तसेच मागील महिन्यात खूप साऱ्या वीज ग्राहकांची चुकीची रिडींग घेण्यात आल्या कारणाने बऱ्याच ग्राहकांची चुकीची क्रेडिट बिले तयार झालेली आहेत.
तसेच ५ -७ महिन्यात सरासरी बिल हे चुकीचे रिंडिंग टाकून नाॅरमल करण्यात आलेली आहेत त्यामुळे बी ८० ची संख्या देखील वाढलेली आहे. यामुळे वीज ग्राहकांना ठेकेदाराच्या चुकी – मुळे अवास्तव वाजवी बिले भरावी लागत आहेत यास संबंधित (अलमदद कॅमप्युटर)ठेकेदार जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
यामुळे या महिन्यापासून चुकीची रिडींग घेण्यात येऊ नये. चुकीची बिले देणाऱ्या ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकण्यात यावे.सदर ठेकेदाराला चाकण व राजगुरुनगर येथेही काळ्या यादीत टाकुन काम काढुन घेण्यात आले,त्याच पद्धतीने येथीही करण्यात यावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली
तसेच उशिरा बिले देणे व चुकीची बिले दिल्यामुळे ग्राहकांना जो मनस्ताप सोसावा लागत आहे त्यातून आपण संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्या ऐवजी दुसरा ठेकेदार नेमून ग्राहकांना मिळणाऱ्या चुकीच्या बिलापासून त्वरित सुटका करावी तसेच रूपिनगर सहयोगनगर येथे विजेचा लपंनडाव होत असून नागरिकांना आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे योग्य ती करवाई करुन वीज ग्राहकाना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना रुपीनगर शाखेच्या वतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.या वेळी संतोष सौंदणकर ( महारष्र्टराज्य विद्युत पुणे जिल्हा संनियंत्रण समिती सदस्य.) नितिन बोंडे (शाखा प्रमुख) अमित शिंदे (युवासेना चिटणीस) सतीश मरळ (विभाग प्रमुख)
संजय गिरी (उपविभाग प्रमुख) अशोक जाधव, रमेश पाटोळे दत्ता ढोले,प्रवीण पाटिल,किशोर शिंदे, गणेश भिंगारे,अजित कदम,अरुण
ढाके व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version