निगडी(१५जुन२०१९,प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-
पिंपरी चिंचवड शहरा मध्ये मॉल, मल्टीप्लेक्समध्ये, हॉस्पिटल, ईत्यादी ठिकाणी पार्किंग शुल्क १०रु. पासुन १००रु पर्यंत आकारले जातात अनेक संस्थानी यावर आवाज उठविला परंतु त्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले परंतु ही बाब आता न्यायालयात गेली असून न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धोरणानुसार मॉल, मल्टिप्लेक्स या पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे .पुणे शहर आणि परिसरात असलेल्या मॉल व मल्टिप्लेक्स मध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही असा ठराव पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समिती मध्ये १४/६/२०१९ ला मंजुर करण्यात आला आहे त्याच धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील परिसरातील मॉल, मल्टिप्लेक्स, इत्यादी पार्किंग निःशुल्क करावा हा निर्णय पुणे महापालिकेच्या अनुषंगाने घ्यावा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिं.चिं.शहरा तर्फ मा. आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष/नगरसेवक मा.श्री.सचिन भाऊ चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मा.श्री.हेमंत डांगे ,सचिव -रुपेश पटेकर, महिला सचिव -सीमाताई बेलापुरकर, उपाध्यक्ष -चंद्रकांत दानवले, राजु सावळे, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष :सुरेश सकट हे उपस्थित होते