Home ताज्या बातम्या विश्व हिंदू परिषदेने शोभा यात्रे बद्दल मांडली भुमिका,पडदा टाकण्याचा प्रयत्न

विश्व हिंदू परिषदेने शोभा यात्रे बद्दल मांडली भुमिका,पडदा टाकण्याचा प्रयत्न

0

चिंचवड(४जुन२०१९, प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) : –पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एयर गणचे ट्रिगर दाबून आवाज केले. तसेच विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते बाराच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला.
या प्रकरणी पोलिस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे. तर शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितिन वाटकर व इतर 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचे व्हिडीओ व फोटो उपल्बध आहेत असे त्यावर पाहुन कार्यवाही केली जाईल ,विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा मंत्री यांना अटक करण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.दरम्यान, शोभा यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींच्या हातात विनापरवाना सोटे, भाले, दांडके, तलवारी आणि बंदुका असल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाल्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.त्यावर प्रतिउत्तारत्मक
विश्व हिंदु परिषद चिंचवड जिल्हा वतीने पञकार परिषद घेतली,व भुमिका मांडली
दुर्गावाहिनी स्थापने पासुन युवतीच्या शारीरीक मानसीक बौद्धिक अशा विकासासाठी देशभरात मे महिन्यात शौर्य प्रशिक्षण वर्ग चालवले जातात,१९९३पासुन शोभायाञा काढल्या जातात,म्हणुन महाराष्र्टात गेल्या चार वर्षात पुणे,इंचलकरंजी,अकलुज,व येवला या भागात शोभा याञा निघल्या आहे,यांचे महिला सबलीकरण प्रतीक दुर्गा माता आहे,त्यामुळे प्रतीकात्क खोटे खडगे मिरवणुकीत वापरले गेले असे प्रतिउत्तर प्रांत अध्यक्ष विवेक कुलकर्णी दिले व १९९३ पासुन या शोभा याञा काढल्या जातात अजुन कोणी कोठेही गुन्हा दाखल केला नाही असे पञकार परिषदेत सांगितले,२७ मे२०१९ ते ३जुन २०१९ रोजी निगडी येथे दुर्गा वाहिनीचे विश्व हिंदु परिषदेने आयोजीत केले होते विशेष भाग शोभायाञा २जुन ला काढली,व याची कल्पना अर्ज दिला होता,तरी पोलिसांनी पुर्वग्रहदुषीत भावनेने विश्वहिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली असा आरोप ही केला आहे,शस्ञे खरी आहेत अशी कल्पना वरीष्ट पोलिस अधिकार्‍यांना दिले व खोटी तक्रार दाखल केली,व महिला सुशिक्षित उच्चशिक्षित राष्र्टभक्त आहेत.त्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत,पोलिस निरीक्षक निकाळजे व पवार यांनी कायद्याचा गैरवापर केला आहे, व विश्वहिंदु परिषदेची बदनामी करत आहेत,त्यामुळे अधिकार्‍यावर गुन्हे दाखल करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने विवेक कुलकर्णी पञकार परिषद घेऊन माहिती दिली,व पञकारांशी बोलणे टाळत पञकार परिषद संपुवुन निघुन गेले या वेळी अॅड.मृणालिनी पडवळ दुर्गावाहिनी प्रांत संलिका,नितीन वटकर जिल्हा मंञी,शरद इनामदार जिल्हाध्यक्ष उपस्थित होते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version