मावळ(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका शेकापच्या नेत्यांनी घेतली असली तरी कर्जत – खालापूरचे कार्यकर्ते आघाडीपासून लांबच आहेत. स्थानिक राजकारणाचे गणित व्यवस्थित नसल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी आघाडीच्या सभेकडे पाठ फिरवली.
पार्थ पवार यांनी उरण,पनवेल या मतदारसंघात जाऊन शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी या भेटी घडवून आणत होते. मात्र रायगड जिल्ह्यात जे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात, त्यातील केवळ कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कर्जतमध्ये आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात वाद आहेत. उरण आणि पनवेल मध्ये राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत शेकापची गरज आहे, तशी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत घेतल्या शिवाय जिंकुन येणे शक्य होणार नाही.हे लक्षात घेऊन तिन्ही पक्ष एकञ झाल्याचे पहायला मिळते.
कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे आणि कर्जतमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सोब येताना दिसत नाहीत. ही गोष्ट पार्थ यांच्या समोर दिसून आली असली तरी . मात्र राष्ट्रवादी मधील नेते अजित पवार यांना कर्जत आणि खालापूरमध्ये पार्थ यांना फटका बसू शकतो हे बैठकीत दिसून आल्यामुळे पार्थ यांना उभे करून त्यांच्या विजयासाठी सर्व ताकद लावावी लागणार आणि मोठी जोखीम पवार यांना यानिमित्ताने घ्यावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्न आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे उरण ,पनवेल,कर्जत विधानसभा मतदारसंघात कधी फिरकतही नाही. त्यामुळे ताकद लावुनही काही फरक पडेल का या वर शंकाच आहे,शेतकरी कामगार पक्ष मागणी करते म्हणून पार्थ यांना उमेदवारी दिली जाते पण त्याच शेकापचे कार्यकर्ते म्हणतात आमच्या पक्षाचा आदेश अजुन आला नाही, असे सांगून अजित पवार यांच्या सभेकडे पाठ दाखवली, कर्जतमध्ये शेकाप कार्यकर्ते मनापासून राष्ट्रवादीसाठी काम करतील का? हादेखील प्रश्न चिन्ह दिसत आहे.त्यामुळे पार्थ यांची राजकीय वाटचाल ही खडतर असुन सध्या मावळ मध्ये अडचणीचे वातावरण दिसत आहेत.