Home ताज्या बातम्या भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतुन सुटका पुण्याला रवाना

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची नजर कैदेतुन सुटका पुण्याला रवाना

0

मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची अखेर नजर कैदेतून सुटका करण्यात आली असून,भीमा कोरेगाव येथे जाण्यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसह पुण्याकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौ-यात पोलीसांचा ताफा मोठ्या प्रमाणात आहे.न्यायालयाकडून सभेला परवानगी मिळाल्यास ते पुण्यात सभा घेतील.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना गेल्या तीन दिवसापासून मालाड येथील हॉटेल मनाली येथे नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र,काही वेळापूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे.प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडल्यानंतर ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुण्याला रवाना झाले आहेत. त्यांच्या या प्रवासादरम्यान पोलीसांचा मोठा फौजफाटा आहे. ते कोरेगाव भीमा येथे जाणार असल्याचे समजते.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना मालाड येथिल हॉटेल मनाली येथे नजरकैदेत ठेवण्यात आहे होते. खबरदारीचा उपाय म्हणून भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यानंतर आपण कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे. परवा चैत्यभूमीवर दर्शनासाठी निघालो होतो. पण सरकारने मला नजरकैदैत ठेवले. अशी टीका करत मला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करणे, असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × five =

error: Content is protected !!
Exit mobile version