अकोला-(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी-आनंद बोदडे)
दि.२२/११/२०१८ रोजी अकोला जिल्हातील तेल्हारा तालुक्या मधील जिल्हा परिषद शाळा इसापुर येथे डिजीटल वर्गखोली करण्यात आली.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे साहय्यक आयुक्त आण्णासाहेब बोदडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यांनी स्वखर्चातुन एल .ई .डी. टि.व्हि शाळेला देण्यात आला.बोदडे साहेबांची नाळ गावाशी जोडलेली आहे,व ते ह्या शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांना गावातील मुले शिक्षण घेऊन मोठ्यापदावर जावेत.व गावाची उन्नती होवो.ह्या साठी ते वारंवार गावातच नव्हे तर तेल्हारा तालुक्यात त्यांचे योगदान राहिले आहे.
ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संघपाल ससाने(अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समीती),प्रमुख अतिथी मिलींद खिराडे (केंद्र प्रमुख माळेगाव),इसापुरचे सरपंच सुनंदा बोरडे,इंजि.अरुण कोरडे,आदी मान्यवर ग्रामसेवक सर्व सदस्य,पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामधर सर यांनी तर सुञसंचलन व अभार प्रदर्शन वसो सर यांनी केले.