पुणे(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी)-महाराष्र्टात वाढते डेंगूचे प्रमाण लक्षात घेता विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेने मुंबई आणि पुणे शहरातील अतिदक्ष विभागांंमध्ये जनजागृती करण्याचे काम सप्टेंबर २०१८ पासून हाती घेतलेले आहे. या अभियाना अंतर्गत मुंबई व पुणे मधील आतापर्यंत ७,०२,००० लोकांपर्यत जागृती करण्याचे काम ७४ स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यात आलेले आहे.
‘डेंगू’ हा मलेरियाप्रमाणे डास चावल्याने पसरतो. ‘डेंगू’ ची साथ पसरविणाऱ्या डासाला ‘एडीस’ डास म्हटले जाते. हा डास दिवसा चावतो. डेंगूच्या मच्छरांची वाढ स्वच्छ पाण्यात होत असल्याने पाणी साठवण्यासाठी वापरात येणारी भांडी पाणी वापरून झाल्यावर स्वच्छ करून ठेवणे. अचानक जास्त ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी किंंवा पाठदुखी, उलट्या होणे, त्वचेवर चट्टे उठणे ही लक्षणे डेंंगू तापाची आहेत. यावर उपाय म्हणून घरामध्ये किंवा आजूबाजूला टायर, कुंड्यांमध्ये पाणी साचू देणार नाही, घरातील अडगळीच्या वस्तूंची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी जेणेकरून त्यामध्ये पाणी साचणार नाही, पाणी साठवण्यासाठी जे ड्रम, बादल्या, डबे, पिंप इत्यादी वापरता ते नीट झाकून ठेवावे जेणेकरून डेंगू मच्छर त्यामध्ये अंडी घालणार नाही, तसेच यासाठीपरिसरात डेंगूच्या अळ्या किंवा मच्छर आढळल्यास स्थानिक आरोग्यखात्याला लोकांनीमाहिती द्यावी यासाठी स्वयंसेवकांनी वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन लोकांना कृती करण्यास मदत केली.
या साथीच्या आजाराबद्दलजागृती निर्माण करण्यासाठी विकास सहयोग प्रतिष्ठान (वि.स.प्र), प्लॅन इंटरनॅशनल यांनीबृहन्मुंबई महानगरपालिका व पुणे महानगरपालिका सोबत गेल्या दिड महिन्यापासून युद्धपातळीवर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्यित समुदायांमध्ये डेंग्यूचे ज्ञान, जागरूकता आणि संवेदनशीलता स्तर सुधारणे हा ह्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. वि.स.प्र. च्या ७४ युवा-स्वयंसेवक पथकाला २२ सप्टेंबर, २०१८ पासून मुंबईच्या ५ विभाग (एन, बी, एल, ई, एम-ई) तसेच ५ ऑक्टोबर, २०१८ पासून पुण्यातील ५ विभाग(येरवाडा-कळस धानोरी, हडपसर-मुंढवा, घोलेरोड-शिवाजी नगर, नगर रोड-वडगावशेरी, कसबा-विश्रामबाग)मध्ये डेंग्यूजनजागृती निर्माण करण्याचे काम ४ स्तरांवरसुरु आहे –घरा-घरांत जाऊन लोकांसोबत संवाद व माहितीपत्रकांद्वारे डास उत्पत्तीस्थाने कशी शोधायची तसेच ती निर्माण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची यासंबंधित प्रबोधन करणे. कर्मचारी वर्ग, युवा वर्ग तसेच वृद्ध मंडळी जास्त प्रमाणात रेडीओ ऐकत असल्यामुळे मुंबई च्या ९८.३ रेडीओ मिरची व पुण्यातील मिरची लव ह्या एफ.एम वाहिन्यांद्वारे जागृती करण्यात येत आहे.तसेच मुंबई व पुण्याच्या लक्ष्यित समुदायांमध्ये ऑटो-मायकिंग द्वारे रस्त्याच्या लगत असलेल्या वस्त्यांमध्ये कारवान च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे.त्याच बरोबर मुंबईतील जरी-मरी, घाटकोपर, जे.जे. हॉस्पिटल-चकाला मार्केट ह्या अति गर्दीच्या बस थांब्यांवर शेल्टरद्वारे प्रचार सुरु आहे.
डेंगू संबंधित जनजागृती करिता ७४ युवांची फौज तयार करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मोहन सुर्वे यांनी दिली तसेच एकूण १० लाख लोकांपर्यंत जागृती करण्याचे वि.स.प्र. चे उद्दिष्ट आहे असे ही ते म्हणाले. या करिता पुणे जिल्हा मोहीम समन्वयक विनोद चव्हाण, अर्चना वैद्य व मुंबई जिल्हा मोहीम समन्वयक महेश शेलार, प्रियंका नंदेश्वर हे कार्यकर्ते डेंगू मोहिमे चे नेतृत्व करीत आहेत.