पिंपरी: दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ घडलेल्या आणि संपुर्ण देशाला हादरवून सोडणा-या ‘निर्भया’ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी स्वागत केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,दिल्लीतील ‘निर्भया’ हे प्रकरण अत्यंत दुर्देवी असून भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.दिल्ली गँग रेप प्रकरणातील पिढीत मुलीचे बलीदान व्यर्थ गेले नाही. न्यायालयाच्या निर्णयाने तिला न्याय मिळाला आहे. नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावत ती शिक्षा कायम ठेवल्यामुळे देशातील महिला वर्गाचा या निर्णयामुळे कायद्यावरचा विश्वास अधिकच बळावला आहे.परंतू समाजात महिलांवरील वाढते अत्याचार पाहता विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, अपहरण, अनैतिक व्यापार इत्यादी गुन्हे लक्षात घेता, पिडीतांना लवकर न्याय मिळावा व महिलांवर होणाऱया गुन्हय़ावर नियंत्रण व्हावे, यासाठी सरकारकडून प्रत्येक राज्यात सर्वत्र स्वतंत्र तपास पथक स्थापन करणे गरजेचे आहे.यामुळे महिलांवर वाढत्या अत्याचारांवर आळा बसेल. दरम्यान,दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणातील नराधमांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येऊन दोषींना लवकरात-लवकर फाशी देण्यात यावी, यानंतर ख-या अर्थाने देशाला दिलासा मिळेल,असे बच्छाव यांनी म्हटले आहे.