सिकंजी सरबत विक्रेत्यांबाबत असत्य विधान करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा भाजयुमोने केला अनोख्या पद्धतीने निषेध
सिकंजी सरबत विक्रीचा स्टॉल लावून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केली राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
मुंबई: १४ जून
सिकंजी सरबताची विक्री करणारा अमेरिकेतील एक साधा सरबत विक्रेता कोकाकोला सारख्या बलाढ्य कंपनीचा मालक बनला अशा आशयाचे विधान
काहीदिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या या असत्य विधानाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या
मुंबई विभागाच्या वतीनेअनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. मुंबईतील एस वी रोड परिसरातील एन एल महाविद्यालयासमोर सिकंजी
सरबत विक्रीचा स्टॉल लावून भाजयुमोच्याकार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजयुमोचे मुंबई महामंत्री तेजींदर तिवाना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाबाबत बोलताना तिवाना म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या
या विधानातकोणतेही तथ्य नसून अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी स्वतःचे हसे करून घेत आहेत. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे
राहुल गांधी हे देशाचे भावी पंतप्रधानबनण्याची स्वप्ने पाहत असून अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास त्यांच्या अशा
ऊलटसूलट वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमाखालावेल, अशी भीतीही तिवाना यांनी व्यक्त केली.
सिकंजी सरबत विक्री करणारी व्यक्ती खरोखरच करोडपती बनते का याची खातरजमा करण्यासाठी आम्ही हेअनोखे आंदोलन करीत असल्याचेही ते म्हणाले.
या आंदोलनास भारतीय जनता युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते. मुंबईकरांनीही या आंदोलनाला चांगलाप्रतिसाद दिल्याची माहिती तिवाना यांनी दिली.