पिंपरी, दि. २२ मे २०१८- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २३ थेरगाव सर्व्हे नं. ०९ येथे बहुउद्देशीय इमारतीच्या कामाचा शुमारंभ आज महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, विधी समितीच्या सभापती माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्य अभिषेक बारणे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसदस्या मनिषा पवार, अर्चना बारणे, अश्विनी चिंचवडे, झामाबाई बारणे, अपर्णा डोके, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य संदीप गाडे, विठ्ठल भोईर, बिभिषण चौधरी, माजी नगरसदस्य विजय लांडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार, आदी उपस्थित होते.
या बहुउद्देशीय इमारतीमध्ये करसंकलन कार्यालय, आरोग्य कार्यालय, अग्निशामक केंद्र व इतर कार्यालयांचा समावेश असणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अत्याधुनिक व्यायामशाळा, मुबलक बेसमेंट व ओपन पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे ७ कोटी खर्च अपेक्षित आहे.
प्रजेचा विकास हे पोर्टल चालुकेल्याबद्दल अभिनंदन