Notice: Function WP_Object_Cache::add was called incorrectly. Cache key must not be an empty string. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.1.0.) in /home/u543793844/domains/prajechavikas.com/public_html/wp-includes/functions.php on line 5905
गुरुकुलम आश्रम शाळा चिंचवड येथील बटरफ्लाय पूलाचे भूमिपूजन - Prajecha vikas
Home पिंपरी गुरुकुलम आश्रम शाळा चिंचवड येथील बटरफ्लाय पूलाचे भूमिपूजन

गुरुकुलम आश्रम शाळा चिंचवड येथील बटरफ्लाय पूलाचे भूमिपूजन

0

पिंपरी, दि. २२ मे २०१८– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १८ मधील विकास आराखड्यातील गुरुकुलम आश्रम शाळा चिंचवड येथील बटरफ्लाय पूलाचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, विधी समितीच्या सभापती माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी,ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, झामाबाई बारणे, अपर्णा डोके, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य संदीप गाडे, विठ्ठल भोईर, बिभिषण चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, माजी नगरसदस्य विजय लांडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार आदी उपस्थित होते.

प्रसुनधाम पासून १८ मी. डी.पी. रस्त्यास थेरगाव चिंचवड पुल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आज झाला. सुमारे २५ कोटी १९ लाख खर्च करून उभारण्यात येणा-या या पुलावरून नागरिकांसाठी नदी परिसराचे दृश्य पाहण्यासाठी पुलाचे मध्यभागी दोन्ही बाजूस २ मी. रुंदीच्या गॅलरीचा समावेश करण्यात येणार आहे. पुलाचे डिझाईन आकर्षक करणेसाठी पुलाला दोन्ही बाजूस फुलपाखराच्या पंखाच्या आकराचे आकर्षक लोखंडी कमानी उभारण्यात येणार असून त्याचे वजन घेण्यासाठी स्पेंडर बारचा वापर करण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + 13 =

error: Content is protected !!
Exit mobile version