औरंगाबाद – पोलिसांनी शहरात उफाळलेल्या दंगलीनंतर शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘हिंदू शक्ती’ मोर्चाला परवानगी नाकरली असून केवळ शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना दंगलीनंतर अटक केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून शनिवारी शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता.
१२ मे च्या रात्री शहरातील २ गटात भीषण दंगल झाली होती. पोलिसांनी या दंगलीनंतर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि लच्छु पैलवान यांना अटक केली होती. तर ‘एमआयएम’च्या फरार झालेल्या फेरोज खान यालाही नंतर अटक केली. पण या अटकसत्रानंतर शिवसेनेने फक्त आपल्याच कार्यकर्त्याला पोलीस अटक करत असल्याचा आरोप केला होता. आणि पोलिसांच्या या कृत्यविराधात मोर्चा काढण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता. हा मोर्चा शनिवारी काढण्यात येणार होता. पण या मोर्चाला एक दिवस शिल्लक असतानाच पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.