Tag: राहुल गांधी
Notice: Function WP_Object_Cache::add was called incorrectly. Cache key must not be an empty string. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.1.0.) in /home/u543793844/domains/prajechavikas.com/public_html/wp-includes/functions.php on line 5905
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती...
पिंपरी, दि.१७ सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (दि. ९ )मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी...
विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – निती आयोगाच्या...
नवी दिल्ली,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण,...
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा...
पुणे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित...
सिकंजी सरबत विक्रीचा स्टॉल
सिकंजी सरबत विक्रेत्यांबाबत असत्य विधान करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा भाजयुमोने केला अनोख्या पद्धतीने निषेध
सिकंजी सरबत विक्रीचा स्टॉल लावून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केली राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
मुंबई: १४ जून
सिकंजी सरबताची विक्री करणारा अमेरिकेतील एक साधा सरबत विक्रेता कोकाकोला सारख्या बलाढ्य कंपनीचा मालक बनला अशा आशयाचे विधान
काहीदिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या या असत्य विधानाचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या
मुंबई विभागाच्या वतीनेअनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. मुंबईतील एस वी रोड परिसरातील एन एल महाविद्यालयासमोर सिकंजी
सरबत विक्रीचा स्टॉल लावून भाजयुमोच्याकार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजयुमोचे मुंबई महामंत्री तेजींदर तिवाना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाबाबत बोलताना तिवाना म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या
या विधानातकोणतेही तथ्य नसून अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी स्वतःचे हसे करून घेत आहेत. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे
राहुल गांधी हे देशाचे भावी पंतप्रधानबनण्याची स्वप्ने पाहत असून अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास त्यांच्या अशा
ऊलटसूलट वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमाखालावेल, अशी भीतीही तिवाना यांनी व्यक्त केली.
सिकंजी सरबत विक्री करणारी व्यक्ती खरोखरच करोडपती बनते का याची खातरजमा करण्यासाठी आम्ही हेअनोखे आंदोलन करीत असल्याचेही ते म्हणाले.
या आंदोलनास भारतीय जनता युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते. मुंबईकरांनीही या आंदोलनाला चांगलाप्रतिसाद दिल्याची माहिती तिवाना यांनी दिली.