देहुरोड,दि.०८ डिसेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देहुरोड वाहतूक विभागाकडून याची सुरुवात करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,संजय शिंदे पोलीस सह-आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, बापु बांगर पोलीस उपआयुक्त वाहतुक शाखा, कसबे सहा, पोलीस आयुक्त २ वाहतुक शाखा, ढेरे सहा, पोलीस आयुक्त -१ वाहतुक शाखा याचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहुरोड वाहतुक विभाग यांचे माध्यमातुन दि. ०७ डिसेंबर २०२३ रोजी यशस्वीपणे राबविण्यात आला.
पिंपरी चिंचवड पोलिस हद्दीतील वाहतूक विभाग आपले दैनंदिन कामाव्यतिरिक्त भविष्यात एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविणार आहेत. विद्यार्थ्यांना विधायक मार्गांनी जीवन जगण्याच्या अनुषंगाने तसेच दररोज वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.आपापल्या कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर, ड्रग्स व व्यसनाधीनतेपासून दूर राहणे तसेच महिला व मुलींचा सन्मान करणे इत्यादी बाबींबाबत माहिती व शिक्षण देण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे
एकदिवस शाळेसाठी या उपक्रमात सहभागी विद्यार्थी.
देहुरोड वाहतूक विभागाच्या वतीने प्रत्येक गुरुवारी एक शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी (दि. ७) सेंट ज्युड हायस्कूल देहुरोड यांच्यापासून करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शाळेतील ४४१ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमाकरिता देहुरोड वाहतूक विभागाचे सपोनि आरदवाड,पोउनि माने,पोहवा माळी,पोशि राठोड,यांनी सुरक्षित वाहतूक वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम, सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर, मादक द्रव्यापासून दूर राहणे, सामाजिक बांधिलकी व महिलांचा सन्मान याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमास सेंड ज्युड शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणुन संबोधिले जाते त्यामुळे ब-याच आजुबाजुचे शहरातील ग्रामीण भागातील मुलं हे शिक्षणासाठी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणासाठी आलेले आहेत. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे जागृत नागरिक असणार आहेत. या विद्यार्थ्यांना विधायक मार्गाने जीवन जगण्याचे अनुषंगाने पोलीस दलाशी संबंधित वाहतुकीचे नियमन सायबर गुन्हेगारी सोशल मिडीयाचा वापर ड्रग्ज व व्यसनाधिनतेपासुन दूर राहणे महिला व मुलीचा सन्मान करणे, इ. बाबी बाबत शिक्षण देण्याचा हा महत्वाचा टप्पा आहे. सदरची बाब लक्षात देता वाहतुक शाखा पिंपरी चिंचवड यांचेवतीने एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. – प्रशांत आरदवाड – (API) सहाय्यक पोलीस निरीक्षक देहूरोड वाहतूक विभाग