किवळे,दि.१९ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-किवळे गाव स्मशान भूमी या ठिकाणी जलपर्णी काढणे अन्यथा पवना नदी मध्ये बसून आंदोलन करण्याचा थेट इशारा राजेंद्र बाळासाहेब तरस(युवासेना उपशहर अधिकारी पिंपरी चिंचवड संस्थापक/अध्यक्ष)यांनी महापालिकेला दिला आहे.किवळेगाव स्मशानभूमी या ठिकाणी जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात झालेली असून ती जलपर्णी काढणे संदर्भात मनपा पर्यावरण विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने हे अंदोलन ठरलेल्या सदर ठिकाणी करणार असल्याचे प्रजेचा विकास शी बोलताना सांगितले,परिस्थिती भयानक झालेली असून मनपा पिंपरी चिंचवड ने गुरुवार दिनांक १९/१०/२०२३ रोजी पर्यंत जलपर्णी काढण्यास सुरुवात करावी अन्यथा शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी किवळे गाव स्मशानभूमी पवना नदी या ठिकाणी नदीमध्ये बसून अंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले. किवळे गाव स्मशान भूमी या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून नदी मध्ये बसून आंदोलन करण्यात येणार आहे.पुढे काही अनुचीत प्रकार घडल्यास त्यास सहशहर अभियंता व संपुर्ण पर्यावरण विभागासह पिंपरी चिंचवड महानगर पालिका जबाबदार राहील असे मत राजेंद्र तरस यांनी बोलताना व्यक्त केले.
Home ताज्या बातम्या शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र तरस करणार पवना नदी मध्ये बसून आंदोलन,पर्यावरण विभागाकडुन…?