पिंपरी,दि.२५ ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी );- राज्यात व शहरात ओबीसी भोवती राजकारण फिरताना दिसत आहे.अनेक राजकारणी ओबीसींच्या मुद्द्यावरती अनेक प्रश्न घेऊन राजकारण करताना दिसत आहे. मात्र अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांच्याकडे शहरात कार्यकर्त नाहीत अशी चर्चा सर्वेञ पसरली होती. शहरातील कामकाजाकासाठी भक्कम असे कार्यकर्ते उरलेले नाही असा सळज सर्व राजकारण्यांना झाला असेल मात्र अशातच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांचा विचारधारेवर, मार्गदर्शनाखाली तसेच सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरात युवक अध्यक्ष इम्रान शेख, व समन्वयक देवेंद्र तायडेंसह नायर यांनी पिंपरी चिंचवड शहरात मोट बांधायला सुरुवात केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला ओबीसी सेल चा नवा शहराध्यक्ष मिळाला आहे. पिंपळे सौदागर मधून किंवा शहरातुन ओबीसीचा राजकारण व राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे काम कोणी करू शकणार नाही. कारण आता ओबीसींचा आवाज पिंपळे सौदागर मधून घुमणार पिंपळे सौदागर चे सुपुत्र विशाल जाधव यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रजेचा विकासशी बोलताना सांगितले.
ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी विशाल जाधव यांना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी नियुक्त केल्याचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. वंदनाताई चव्हाण,संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, इम्रान शेख युवक अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते,सचिन निंबाळकर, विशाल क्षिरसागर, विशाल शिंदे,शाहीद शेख,अशोक हरपळे व पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, सुवर्ण वाळके,कविता देवकर दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विशाल जाधव हे बारा बलुतेदार या संघटनेत ही कार्यरत आहेत. अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ते कार्यरत आहे. बारा बलुतेदार व तसेच ओबीसी व इतर समाज घटकांशी विशाल जाधव यांची नाळ जोडलेली आहे. जनमानसात सतत वावरणारा सामाजिक, राजकीय, धार्मिक सर्व क्षेत्रात निस्वार्थीपणे पुढाकार घेऊन स्वतःला झोकून देऊन काम करणारा नेता म्हणून विशाल जाधव यांची ख्याती आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसींच्या प्रश्नावर तसेच बारा बलुतेदारांच्या प्रश्नावर आवाज उचलत पिंपरी चिंचवड शहरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार विशाल जाधव यांनी केला आहे.
विशाल जाधव यांनी बोलताना सांगितले मी अनेक जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. अनेक जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. मात्र या जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर काम करताना अनेक अडचणी निर्माण होतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, आपल्या सर्वांच्या प्रश्नावरती मी एक पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून सतत पाठपुरावा करत राहील.आपल्या न्याय हक्कासाठी सामाजिक प्रश्नांसाठी सदैव मी जनतेचा होतो आणि मी जनतेतलाच राहील पिंपळे सौदागर मध्ये जरी मी राहत असलो, तरी संपूर्ण शहरांमध्ये मी त्याच ताकतीने काम करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन शहरात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. सतत सर्वांना वर्चस्वाची लढाई हवी आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या प्रश्नांवरती लक्ष देत आपण त्या प्रश्नांचा पाठपुरावा करत ओबीसीच्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत कसा न्याय देता येईल. याकडे मी सदैव लक्ष देऊन न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
विशाल जाधव यांच्या अनेक समाज घटकातून ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्या मुळे सन्मान केले जात आहेत. व तसेच बारा बलुतेदार व चळवळीतील सर्व घटकांमध्ये विशाल जाधव यांच्या नियुक्तीने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.