रावेत,दि.१० ऑगस्ट २०२३(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे यांच्या वतीने भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.(दि.०९ ऑगस्ट) ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे , चिंचवड येथे पार पडला.महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाचे संचालक सचिन ईटकर कार्यक्रमाचे अध्यक्ष तर टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितीत होते.
या सोहळ्यात दिपक मधुकर भोंडवे यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा कृषी उद्योगभूषण पुरस्कार) पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार), रवींद्र डोमाळे यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार), सोनाली किरण ढोकले यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा ग्रामभूषण पुरस्कार) नीलेश रामाणे यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा उद्योजक पुरस्कार), अमर लाड यांना (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा उद्योजक पुरस्कार) सन्मानित करण्यात आले.